सिरसोली ते भोकर शेतरस्त्याची दयनीय अवस्था ?

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा तालुक्यातील सिरसोली परिसरातील शेतरत्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून याचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे शेतातील माल घरी आणण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे शेत रस्ते चीखलमय झाल्याने वाहने फसत आहेत यंदा सुरवातीला बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती त्यानंतर सतत चालू असलेल्या पावसामुळे पिकांचे खूप मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले नंतर परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले असताच आता सिरसोली ते भोकर रत्याअभवी शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे सिरसोली परिसरातील भोकर रस्त्याची अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे या भोकर रस्त्यावर अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत यातच शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन सोगून पडलेलं आहे. या रस्त्या अभावी सोयाबीन काढण्या साठी मशीन जात नसल्यामुळे विठ्ठल काईगे या कास्तकारणे सोयाबीन ट्राली मध्ये भरून घरी आणण्या साठी निघाले असता रसत्या मध्ये ट्राली पलटी झाली बर म्हणून बर काही जिवीत हानी झाली नाही तरी सबंधित विभागाने लक्ष देऊन रस्ता दुरुस्ती करण्याची सिरसोली वासियांची मागणी होत आहे.