ताज्या घडामोडी

परीक्षेच्या संकटातून विद्यापीठाने काढला पळ..

विद्यापीठाने स्वतःच्या गळ्यातील घोंगळं
टाकले महाविद्यालयाच्या गळ्यात…

अविनाश पोहरे – संपादक

सं. गा. बा. अ. वि. अमरावतीने जाहीर केलेल्या पत्रकानुसार उन्हाळी 2020 अंतिम वर्षाच्या परिक्षा ह्या आता संलग्नित महाविद्यालयात होणार आहे. परिक्षेसंदर्भातील सर्व अधिकार आता महाविद्यालयाला असतील. त्यामध्ये ऑनलाइन/ऑनलाइन व असायमेंट अशा पध्दतीचा अवलंब करण्यात येईल. एकंदरीतच हा निर्णय म्हणजे विद्यापीठाने स्वतःच्या गळ्यातील घोंगळं महाविद्यालयाच्या गळ्यात टाकून स्वतःचा नाकर्तेपणा विद्यार्थ्यांसमोर मांडला आहे.एका विशिष्ट विद्यार्थी संघटनेला हाताशी धरुन आधीचं नियोजित होम असायमेंट चा पर्याय देऊन त्याचं श्रेय एका विशिष्ट संघटनेला देण्याचं काम केले आहे. बाकीच्या संघटनांना सापत्न वागणूक विद्यापीठाने दिली आहे. ही अत्यंत निंदनीय आणि खेदजनक बाब आहे.विद्यापीठ या परीक्षेच्या कामात सपशेल फेल ठरलेलं आहे. त्यामुळे सर्व जबाबदार असणाऱ्या घटकांना व अधिकाऱ्यांना तुम्ही नाकर्ते आहात हे कबूल करा व स्वतःचं आत्मपरीक्षण करून राजीनामा द्या.तुम्हाला या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. अशी सम्यक विद्यार्थी आंदोलनाची भूमिका असणार आहे. सोबतच आता महाविद्यालय परीक्षा कशा पध्दतीने घेतील हे देखील पाहण्यासारखे असेल. कारण ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्याकरिता महाविद्यालये सक्षम नाहीत आणि तसा अजेंडा देखील त्यांच्या कडे तयार नाही. राहिला प्रश्न महाविद्यालयात जाऊन ऑफलाईन पद्धतीने परीक्षा द्यायचा तर ugc नियमानुसार परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असे निर्देश होते. जर विद्यार्थी महाविद्यालयात जाऊन पेपर देत असतील तर त्या ठिकाणी सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाल्या शिवाय राहणार नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे काही दिवसाअगोदर प्रवेशपत्र घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात केलेली गर्दी आहे.
परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना जर कोरोनाची लागण झाली तर महाविद्यालयाचे प्राचार्य जबाबदारी स्वीकारतील काय? विद्यापीठ आणि महाविद्यालयांना एवढेच सांगणे आहे की विद्यार्थ्यांच्या जीवनाशी व भविष्याशी खेळू नये. महाविद्यालयाने आता हलगर्जीपणा न करता युद्धपातळीवर कार्य करावे. विद्यार्थी महाविद्यालयात विचारणा करण्यास आले तर त्यांचे समाधान करावे. विद्यार्थ्यांनी गोंधळून जाऊ नये. काही अडचणी आल्या तर सम्यक विद्यार्थी आंदोलनाशी 9822480764 या नंबरवर संपर्क करावा. आपले शैक्षणिक कोणतेही नुकसान होणार नाही.

  • विशाल नंदागवळी
    चंद्रपूर जिल्हा निरीक्षक व
    अकोला जिल्हा प्रवक्ता
    (सम्यक विद्यार्थी आंदोलन)
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: