ताज्या घडामोडी

पातुर अकोला मार्गावर मालवाहू वाहन आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडी मध्ये भीषण अपघात 3 ठार 5 जखमी.

अविनाश पोहरे / अकोला एक्सप्रेस न्यूज नेटवर्क, पातूर

पातूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अकोला ते पातुर मार्गावरील चिखलगाव ते कापसी दरम्यान मालवाहू व खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाचा समोरासमोर धडक होऊन यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला तर अन्य 5 जण जखमी झाल्याची घटना शनिवारी 16 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता झाली आहे.प्रवासी घेऊन पातूर च्या दिशेने येत असलेल्या एम एच 3753 81 क्रमांकाच्या प्रवासी वाहनास विरुद्ध दिशेने जात असलेल्या एम एच 30एल 29 96 या मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली या अपघातात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एका जणांचा मृत्यू उपचारादरम्यान झाला.तर यामध्ये यातील चिमुकली गायत्रीची ची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे.
मृत्यू झालेल्या मध्ये हे लक्ष्मीबाई रामभाऊ वंजारे वय 75 वर्षे राहणार मुंगळा तालुका मालेगाव तसेच बाळू बळीराम कुरे वय 35 राहणार मुंगळा तालुका मालेगाव यांचा सुद्धा मृत्यू झाला आहे आणि सौ दगडाबाई बळीराम कुरे वय 65 वर्षे ह्या जखमी आहेत तर संजय निवृत्ती राऊत चालक राहणार मुंगळा याचा सुद्धा मृत्यू झाल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे यामध्ये कुमारी गायत्री ज्ञानेश्वर वंजारे दोन वर्ष ही चिमुकली सुद्धा गंभीर असून अकोला रुग्णालयांमध्ये खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे तर टाटा चालक आणि टाटा मधील दोन जण सुद्धा जखमी झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली असून वृत्त लिहीपर्यंत टाटा चालक व टाटा वाहनांमधील जखमींची माहिती मिळाली नाही.
पातुर पोलिसात फिर्यादी शामराव नामदेव चतरकर वय 40 वर्षे राहणार कळंबेश्वर तालुका मालेगाव जिल्हा वाशिम यांनी तक्रार दिल्यावरून पातुर पोलिसात कलम 279 ,337 ,338, 304अ भा द वि 184 एम व्ही ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी ठाणेदार हरीश गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पातुर पोलिस तपास करीत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: