मेडशी ग्रामपंचायत निवडणूक मतदान कक्षाला एस पी वसंत परदेशी यांची भेट

अजय चोथमल
प्रतीनीधी मेडशी
मालेगाव तालुक्यातील मेडशी ग्रामपंचायत निवडणूक येत्या १५ जानेवारीला होत आहे त्या निमित्ताने वसंत परदेशी एस पी ( वाशीम ) यांनी दि. ७ जानेवारी दुपारी दोन वाजता जिल्हा परिषद मराठी शाळा येथे मतदान केंदाचीपाहणी केली. तर येथे मेडशी ग्रामपंचायत मधे तेरा सदस्या साठी निवडणूक होत आहे तर मतदाना साठी जिल्हा परिषद मराठी शाळा, मध्ये तिन वार्डाचे मतदान होते.व श्री नागनाथ मा. विद्यालय या शाळेत दोन वार्डाचे मतदान होते आशा दोन शाळेत दर वर्षी मतदाना साठी असतात.यावेळी परदेशी साहेबांनी येथील राजकीय पुढारी, व जनतेला सांगितले की या निवणुकी काळात कोणत्याही प्रकारचे वाद विवाद न होता एकोपाने, आनंदाने या निवडणुकीत सर्व जनतेते सहभाग होऊन मतदान करा व भांडण तंटे करू नका या वेळी सांगितले.मेडशी ग्रामपंचायत निवडणूक मध्ये मुकुंदराव मेडशीकर, शेख गणीभाई, दत्तराव घुगे या तिघाचे पँनल आहेत.यावेळी मेडशी येथील रणजीत मेडशीकर, प्रदिप तायडे, कैलास ढाले, शौकत पठाण, सुधाकर बबन राठोड, मुलचंद चव्हाण, ज्ञानेश्वर मुंढे, व पोलीस कर्मचारी उपस्थित होते