जिल्हाधिकारी यांची “माझी वसुंधरा” संकल्पना गावागावात राबविण्याचा द प्रोफेशनल करिअर अकॅडमीने केला निर्धार पक्का

पंकज पोहरे यांचे जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन.
अविनाश पोहरे – अकोला एक्सप्रेस न्यूज नेटवर्क
पातूर शहरातील एकमेव सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेली द प्रोफेशनल करिअर अकॅडमी बहुउद्देशीय संस्थेचे संस्थाध्यक्ष पंकज पोहरे हे गेल्या तीन वर्षापासून सामाजिक क्षेत्रात समाज हिताच्या कामात व्यस्त असतात. नुकतीच जिल्हाधिकारी यांनी ‘माझी वसुंधरा’ संकल्पना जिल्ह्यात राबविण्याचे निर्देश दिले असता द प्रोफेशनल करिअर अकॅडमीने निर्धार पक्का केला असून ही संकल्पना गावा-गावात नेण्याचे आश्वासन दिले आहे.
सध्याची स्थिती लक्षात घेता पृथ्वीवर होणाऱ्या अन्याय म्हणजेच कचरा, पाणी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, वृक्षतोड, अशा असंख्य संकटांची वसुंधरा लढत आहे म्हणून आता आपली सामाजिक बांधिलकी म्हणून सर्वांनी समोर येण्याची वेळ आली आहे. जर आता वृक्ष तोड थांबवले नाही तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. मनुष्य आपल्या स्वार्थासाठी रस्त्यावरची महाकाय वृक्ष तोडायला पण मागे हटत नाही यासारखे दुर्दैवी गोष्ट कोणतीच नाही म्हणून आता आपण एकत्र येऊन कचरा व्यवस्थापन करूया पाण्याचा अपव्य टाळूया,ध्वनी प्रदूषण थांबूया, व येत्या एक तारखेपासून सर्वांनी पक्का निर्धार करून वाहनाचा कमीत कमी वापर करुन पर्यावरणाची हानी होणार नाही याकडे लक्ष देऊन द प्रोफेशनल करिअर अकॅडमी चे आपण सर्वांना आवाहन आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन संस्थेला जुळून समाजहिताचे काम करून माझी वसुंधरा वाचवूया व येणाऱ्या पिढीला संकटापासुन दूर करूया असे आवाहन संस्थापक अध्यक्ष पंकज पोहरे यांनी केले.