ताज्या घडामोडी
राजेश दिवनाले योग समिती सहयोग शिक्षक प्रमाणपत्राने सन्मानित

नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी
बाळापूर पतंजली योग पीठ ट्रस्ट हरिद्वार द्वारा संचालित पतंजली योग समिती सहयोग शिक्षक प्रशिक्षण कालावधी 1 महिना या योग शिक्षकाचे यशस्वी रित्या ट्रेनिंग पूर्ण करून आज राजेश दिवनालें शिक्षक संत गजानन इंग्लिश मिडीयम स्कूल,पारस.यांना योग गुरू उमेश बांबडकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.या पूर्वी यांनी हरिद्वार येथे 2017 मध्ये घेण्यात आलेल्या शिबिरा मध्ये सहभागी झाले होते. व स्वामी रामदेव यांच्या उपस्थितीत हे शिबिर घेण्यात आले होते.राजेश रामरतन दिवनाले हे मनारखेड ता.बाळापूर चे रहिवासी असून तरुण तडफदार एक युवा सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखल्या जातात.यापूर्वी सुद्धा त्यांना विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.