एम. सी. एल प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा संपन्न

पत्रकार बांधवांचा MCL टीम द्वारे करण्यात आला सत्कार
अकोला एक्सप्रेस न्यूज नेटवर्क –
पातूर:- शेतकऱ्यांच्या कच्च्या मालापासून तयार करण्यात येणाऱ्या सीएनजी आणि पीएनजी युनिटची उभारणीचे काम पातुर तालुक्यातील ग्राम नवेगाव येथे सुरू होत आहे. शेतकऱ्यांना सक्षम बनवणारा आणि पातुर तालुक्यात रोजगाराची क्रांती घडविणारा या प्रोजेक्ट चे भूमिपूजन सोहळा दिनांक 16 डिसेंबर 2020 रोजी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या हस्ते करण्यात आला.प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई चे उपजिलधिकारी डॉ.शाम शिवाजी घोलप,जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्रीबाई राठोड, पातूर पंचायत समिती सभापती लष्मीबाई डाखोरे, जिल्हा परिषद सदस्य अर्चना ताई राऊत, पातूर पंचायत समिती उपसभापती नजम उंनिसा मोहम्मद इब्राहिम, तर प्रमुख पाहुणे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदेवे, वनविभागाचे उपवनसंरक्षक विजय माने, तालुका कृषी अधिकारी विनोद शिंदे,एकात्मिक बालविकास अधिकारी समाधान राठोड, पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हरीश गवळी,चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ, आरोग्य अधिकारी विजय जाधव होते. तसेच पातूर तालुक्यातील पत्रकार संतोष गवई, श्रीकृष्ण शेगोकार, अविनाश पोहरे,रामेश्वर वाढी सर्व पत्रकार बांधवांचा MCL चे संचालक छगन राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम हा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या नियमानुसार मास्क व सॅनिटायझर चा वापर करून करण्यात आला. तर विशेष उपस्थिती म्हणून कार्तिक रावल, किशोर राठोड, रणजित दातीर, वैभव चव्हाण, छगन राठोड आदी प्रामुख्याने उपस्थित होते.