पातूर तालूका विकास मंचाने सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना दिला प्रस्ताव.

आम्ही पातुर तालुका व शहराचा विकास करण्याकरिता प्रयत्नशील आहोत.
पातुरच्या श्री काशी कवडेश्वर कडे गावातून जाणा-या रस्त्याने नदीवर पुलाचे बांधकाम तसेच चिचखेड पर्यंत खडीकरण करून डांबरीकरण व्हावे जेणेकरून भक्तांना कुठलीही अडचण भासणार नाही.
नवयुवकांना व पातुर तालुक्यातील अनेक बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करणे हे आमचे ध्येय आहे
पातुर तालुका विकास मंच संयोजक ठाकूर शिवकुमार सिंह बायस
अविनाश पोहरे – संपादक
पातूर शहराला व तालुक्याला ऐतिहासीक धरोवर पुरातन काळापासून मिळाली असून हा भाग जिल्ह्यातील शेती विषयक फुलबाग,फळबाग,केळीबाग,व विविध प्रकारच्या हिरव्या भाज्या करिता नावाने ओळखला जातो तरी सुद्धा या भागात रस्ते,पाणी साठवण्या करिता अपुरे बंधारे , अनेक गोष्टींच्या अभावामुळे विकासात्मक धोरण ठेवून पातुर तालुका विकास मंच ने पुढाकार घेऊन जनहिता करिता व नवयुवकांना दिशा व रोजगार मिळण्याकरिता शासनाच्या निदर्शनास या बाबी आणून पातुर येथील पुरातन काळा पासून असलेले कवळेश्वर मंदीर सुवर्णा नदीवरील पूल,ते चिंचखेड रस्त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांना मंत्रालय मुंबई येथे प्रस्ताव सादर केले आहे त्यांनीही या प्रस्तावाचा विचार करून याविषयी सकारात्मकता दर्शवीली आहे या प्रस्तावाला लवकरच मंजुरी देण्याचे त्यांनी आश्वासन यावेळी दिले आहे.
याप्रसंगी भाजपा उपाध्यक्ष गणेश गाडगे,राणा अशोक सिंह इंगळे, रितेश सौंदळे,किरण कुमार निमकंडे, योगेश फुलारी,रामदास श्रीनाथ,आदी मान्यवर उपस्थीत होते.