ताज्या घडामोडी
अनाथांना मोफत वैद्यकीय सेवा देऊन वाहिली संत सेवालाल महाराजांना आदरांजली !

अंध,अपंग आणि अनाथांची मोफत वैद्यकीय सेवा
अविनाश पोहरे – संपादक
पातूर – थोर समाज सुधारक क्रांतीकारी मानवतावादी संत श्री सेवालाल महाराज यांच्या 282 व्या जयंती निमित्त खानापूर रोड,पातूर येथील श्री सेवा क्लीनिकचे संचालक डॉ शांतीलाल चव्हाण यांनी परिसरातील अंध,अपंग आणि अनाथांची मोफत वैद्यकीय सेवा व औषधोपचार करून वाहिली संत सेवालाल महाराजाना आदरांजली यावेळी विनोद चव्हाण, रामगोपाल जाधव, डॉ सुधाकर चव्हाण, निलेश हिवराळे, शहेजाद खान देवेन्द्र हिवराळे, नितेश राठोड, ओम चव्हाण,वैभव जाधव मनोहर राठोड, विशाल पवार, हरिष शेगोकार, प्रमोद हिवराळे विजय शिंदे, यश चव्हाण आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.