पातूर येथील श्री.नानासाहेब यात्रा महोत्सवावर कोरोनाचे सावट

पातूर शहराची ओळख असणाऱ्या नानासाहेबांची यात्रा रद्द
अविनाश पोहरे – अकोला एक्सप्रेस न्यूज नेटवर्क, पातूर
पातूर : देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून त्याचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करीत यावर्षी होत असलेला श्रींचा यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला आहे.
पातूर शहराची ओळख असलेल्या श्री नानासाहेब यांचे प्राचीन मंदिर पातूर शहरात स्थित आहे.दरवर्षी रथसप्तमीच्या तिसऱ्या दिवशी मंदिराच्या परिसरात महाप्रसाद तसेच यात्रेचे आयोजन करण्यात येत असते.पंचक्रोशीतील भाविक दर्शनासाठी येऊन महाप्रसादाचा लाभ घेतात.
संपुर्ण देशात कोरोनाचे थैमान माजले असतांना सर्व प्रकारचे सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करीत यावर्षी पातूर येथे उद्या दि. 22 / 02 /2021 रोजी होऊ घातलेला श्री. नानासाहेब यात्रा महोत्सव रद्द करण्यात येत आहे,जेणेकरून भाविकांची गर्दी जमा होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, तसेच केवळ दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मास्क/सॅनिटायजरचा उपयोग करून एकावेळी पाचच्या वर लोक मंदिरात येऊ नये व फिजिकल डिस्टनसिंगचे पालन करावे. असे आवाहन श्री.नानासाहेब चॅरिटेबल ट्रस्ट,पातूर यांनी केले आहे.याची परिसरातील सर्व भाविकांनी नोंद घ्यावी.