सुट्टीच्या दिवशी कार्यालय फायलिंग शिफ्टिंगचे सुरू होते काम. प्रहारसेवक मनोज पाटील यांनी उधळून लावला डाव.

अमोल करवते – ब्युरो चिफ
अकोला : जिल्ह्यातील पशुसंवर्धन विकास महामंडळाचे कार्यालय नागपूर येथे हलविण्यात आल्याने त्या कार्यालयातील फाईल , अन्य दस्तावेज हलविण्याचे काम रविवारी काही अधिकारी , कर्मचारी करीत होते. सुट्टीच्या दिवशी सदर प्रकार सुरू असल्याची माहिती मिळताच प्रहार सेवक मनोज पाटील यांना कळताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सदर गाडीला घेराव घालीत सर्व फाईली या जप्त करीत खदान पोलिसांच्या स्वाधीन केल्या. यावेळी सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळनिर्माण झाला होता. जिल्ल्यातील पशुसंवर्धन विकास महामंडळाचे कार्यालय हे नागपूर येथे हलविण्यात आले . सदर कार्यालय नागपूर येथे हलविण्यात आल्याने अकोल्यात मोठया प्रमाणात रोष निर्माण झाला. जिल्हयात महाबीज आणि पशुसंवर्धन विकास महामंडळ ही दोनच राज्य दर्जाची कार्यालय होती त्यापैकी एक कार्यालय नागपूर येथे हलविण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला असून हा जिल्यावर अन्याय होत असल्याचा सूर यावेळी मनोजपाटील यांनी व्यक्त केला. त्यातच रविवारी सुट्टीच्या दिवशी सदर कार्यालयातील अधिकारी , कर्मचारी महत्वाचे फाईल व दस्तावेज गाडीत भरून नेत असल्याची माहिती मिळताच काही वेळातच प्रहारसेवक मनोज पाटील यांनी आपल्या कार्यकत्यांसह सदर कार्यालयावर धाव घेत अधिकारी कर्मचाऱ्यांचा डाव उधळून लावला. यावेळी त्यांच्या वाहनातुन भरलेल्या सर्व फाईली व दस्तावेज प्रहारच्या कार्यकत्यांनी काढून खदान पोलिसांच्या स्वाधीन केल्या यावेळी काही काळाकरिता तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
राज्य दर्जाचे कार्यालय अकोल्यातच राहण्यासाठी शेवटपर्यंत लढा देणार !
अकोला जिल्हात महाबीज आणि पशुसंवर्धन विकास महामंडळ हीदोनच राज्यदर्जाची कार्यालये आहेत . पशुसंवर्धन विकास महामंडळ हे अकोल्यातून हलविण्यात येत असल्याने काही दिवसातच महाबीज सुष्दा अकोल्यातून हलविले जाऊ शकते . त्यामुळे सदर कार्यालय हे अकोल्यातच राहावे याकरिता आपण शेवटपर्यंत लढा देऊ.
मनोज पाटील , अकोला प्रहारसेवक