पातुर तालुक्यातील कोठारी बु.येथील प्रगतिशील शेतकरी शेषराव कांबळे यांच्या शेती पिकाची पिक पाहणी…

ग्रामीण प्रतिनिधी – सतिश कांबळे / कोठारी बु.
पातुर तालुक्यातील कोठारी बुद्रुक येथील प्रगतिशील शेतकरी श्री शेषराव कांबळे यांच्या शेतात ग्रीन गोल्ड सीड्स कंपनीचा गोल्ड 23 व गोल्ड 21 या जातीचा गहू पेरला आहे. ह्या जातीच्या गव्हाच्या ओंब्या मध्ये 50 ते 55 दाण्याची संख्या असून वाढ मर्यादित आहे. चमकदार आणि सोनेरी रंगाचे आहे. कोठारी बुद्रुक येथील बरेच शेतकरी ह्या जातीचा गहू पेरतात हा गहू इतर शेतकऱ्यांनी सुद्धा पेरावा व चांगल्या दर्जाचे उत्पन्न घ्यावे या उद्देशाने यांनी शेषराव कांबळे यांच्या शेतामध्ये पीक पाहणी कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाला बऱ्याच शेतकऱ्यांनी हजेरी दिली. कार्यक्रमांमध्ये शेत मालकाचे श्रीराम कृषी केंद्राचे संचालक प्रवीण सरप व दीपा कृषी केंद्राचे संचालक शंकर राव नाभरे यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. या कार्यक्रमांमध्ये अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. पातुर तालुक्यातील काही शेतकरी दरवर्षी ग्रीन गोल्ड कंपनीचा गहू दरवर्षी पेरतात. कारण तो खाण्याकरिता व उत्पादनाकरीता या दोन्ही गोष्टी करिता चांगला आहे. चमकदार गहू असल्यामुळे मार्केटमध्ये चांगल्या भावाने विकला जातो. असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. आणि या कंपनीचे झोनल मॅनेजर अभिजीत चांगले यांनी ग्रीन गोल्ड कंपनीचे इतर संशोधित वाण विषयी माहिती दिलीतसेच तसेच मार्केटिंग ऑफिसर मोहन ताले यांनी भाजीपाला सोयाबीन तूर इतर पिकाबद्दल माहिती दिली या कार्यक्रमाला कोठारी बुद्रुक, कोठारी खुर्द,आस्टूल, पास्टूल, पांग्राबंदी, येथील शेतकऱ्यांनी हजेरी दिली.