कोरोना चे वाढते प्रादुर्भाव रोकथांब करिता उपाययोजना करणेबाबत आढावा बैठक

हरीष गाठेकर
तालुका प्रतिनिधी
मुर्तिजापूर:- आज विश्राम गृह मुर्तिजापूर येथे आमदार हरिषभाऊ मारोतीआप्पा पिंपळे यांनी COVID-19 कोरोना महामारी चे वाढते प्रादुर्भाव रोकथांब करिता उपाययोजना करणेबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत मुंबई येथून मुर्तिजापूर कोविड 19 स्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेले राज्यस्तरीय नोडल अधिकारी डाॅ.साळुंखे यांनी सर्व उपस्थितांना विशेष मार्गदर्शन व सुचना दिल्या.
बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.चव्हाण, उपविभागीय अधिकारी मोहीते साहेब, श्रीमती ल.दे.रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डाॅ. सोनोने साहेब, डाॅ.नेमाडे साहेब, निवासी तहसीलदार डाबेराव साहेब, मुख्याधिकारी लोहकरे साहेब, शहर ठाणेदार यादव साहेब, ग्रामीण ठाणेदार शेख साहेब, गटविकास अधिकारी बयस साहेब, कमलाकर गावंडे, गजानन नाकट सह संबंधित अधिकारी व कर्मचार्यांची उपस्थिती होती.
COVID-19 चे वाढते प्रादुर्भाव रोकथांब करिता आवश्यक तपासणींचे नियोजन, मास्क लावने अनिवार्य, सेनिटायझेशन, सोशल डिस्टंसींग, स्वच्छता सह अन्य आवश्यक विषयात वेगवेगळ्या विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यानी एकमेकां सोबत सामंजस्याने कार्य करीत आपण कोरोना वर मात करु या अशा संदेश देत सुचना व निर्देश संबंधित अधिकारी व कर्मचार्यांना दिले. यावेळी व संबंधित कर्मचार्यांची उपस्थिती होती.