विद्यार्थ्यांनी ऑफलाईन शिक्षण घेण्यासाठी नेहमी उपस्थित राहण्याचे रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद चे जिल्हासंघटक आकाश हिवराळे ह्यांचे आवाहन

अविनाश पोहरे – संपादक
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.उदयजी सामंत ह्यांनी 15 फेब्रुवारी पासून महाविद्यालय नियमित चालू करण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय अतिशय योग्य व विद्यार्थी हिताचा आहे तरी ह्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.व शिक्षणमंत्री उदयजी सामंत ह्यांना 50 टक्के ऐवजी 100 टक्के उपस्थिती मध्ये महाविद्यालय चालू करण्यासाठी मागणी सुद्धा करणार असून सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरळीत योग्य ती काळजी व उपाययोजना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत येत असणाऱ्या सर्व महाविद्यालयातील प्राचार्यांनी घ्यावी.असे स्पष्ट आदेश देऊन त्यात दिरंगाई करणाऱ्या महाविद्यालयावर तात्काळ कार्यवाही करण्याची आमची मागणी राहील जेणेकरून विद्यार्थी शिक्षण घेत असताना कोरोना आजाराला बळी पडू नये जेणेकरून त्यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक मनोबल खचनार नाही तरी विद्यार्थ्यांनी आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी नियमित महाविद्यालयात शिकवणी वर्गाला जाऊन सुरळीत शिकवणी वर्ग करावे व आपले शैक्षणिक भवितव्य सुरळीत करावे असे जाहीर आवाहन रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद चे जिल्हासंघटक (विद्यार्थी नेते) आकाश हिवराळे ह्यांनी केले आहे.