संत सिदाजी महाराज संस्थान पातूर यांची विना वादक करिता मागणी केली पूर्ण…

पातूर तालूका विकास मंच हे विकास हा शहराचा ग्रामीण भागातील गावांचा व नवयुवकांन सोबतच देवस्थानांचा सुद्धा विकास होणे गरजेचे – ठाकूर शिवकुमार सिंह बायस
अविनाश पोहरे – संपादक
संत तुकाराम महाराज यांच्या अभंग वाणी मध्ये साथ देणारे वाद्य विणा हे परंपरागत असून गेल्या अनेक शतकापासून संत आणी विणा यांचे अतूट बंधन असल्याचे दिसून येते विणेचा सर्व सप्ताहांत उदा.भागवत सप्ताह , रामायण कथा,ज्ञानेश्वरी पारायण इत्यादी अभंग व कीर्तनामध्ये एक विशिष्ट वीणा वादकाला स्थान प्राप्त झाले असून पातुर येथील संत सिदाजी महाराज संस्थान येथे या विणेची मागणी पातुर तालुका विकास मंचाकडे पंचमंडळाकडून झालेली होती.त्यावर गांभीर्याने विचार करून खरोखरच मंदीरात विणेचं महत्व काय आहे हे ओळखून….
पातुर शहराचे आराध्य दैवत संत श्री सिदाजी बुआ महाराज संस्थान ला पातुर तालुका विकास मंचाचे संयोजक ठाकुर शिवकुमारसिंह रतिपालसिंह बायस यांच्या कडून विणा सप्रेम भेंट देण्यात आला यावेळी पातूर येथील संत सिदाजी महाराज संस्थान चे सदस्य श्री देवानंद शेवलकार, सौ शेवलकार, सचिन शेवलकार, ठाकूर शिवकुमार सिंह बायस, गणेश गाडगे, योगेश फुलारी, रितेश सौंदडे गुरुजी, किरण कुमार निमकंडे, अजित अलाट यांनी संत सिदाजी महाराज संस्थान पातूर यांच्या सेवेशी विना वाद्य अर्पण केले