चिखलगांव येथील शेतकरी विलास मेतकर यांनी फुलशेती सोबत काळा गव्हाची केली पेरणी..

पारंपारीक शेतीला फाटा –
अविनाश पोहरे – संपादक
अकोला एक्सप्रेस न्यूज नेटवर्क
पातूर – चिखलगांव येथील शेतकरी विलास मेतकर यांनी पारंपारीक शेतीला फाटा शेतातील उत्पन्न वाढी करीता फुलशेती सोबत काळा गव्हाची पेरणी करुन कमी खर्चात उत्पन्न वाढवले आहे आरोग्य करीता लाभदायक असलेल्या काळा गहु कमी खर्चात येत असुन या पासुन उत्पन्न सुध्दा वाढविले जात आहे त्याच्या काळा गव्हाचा चांगली मागणी येत असुन कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळत असल्याचे त्यानी सांगीतले आहे.
आपल्या कडे पारपारीक शेती व्यवसाय म्हटला की सोयाबीन कपाशी तुर ही पिके आहे या मध्ये शेती लागवडी करीता लागणारे खर्च व त्या मधुन येणार उत्पन्न याचा ताळमेळ बसत नाही या शिवाय निर्सगाचा लहरी पणा जंगली प्राणी या पासुन होणारे पिकाचे नुकसान या मुळे नेहमी तोट्यात असलेल्या शेती पासुन उत्पन्न वाढी करीता त्यानी पांरपारीक पिका सोबतच शेतात फुलशेती व काळा गहुचा पेरा केला आहे . विलास मेतकर यांच्याकडे चाळीस एकर शेत जमीन असुन त्यानी सोयाबीन तुर कपाशी या सोबत दरमहा आर्थिक उत्पन्न वाढी करीता यांनी शेतात गिलाडी, निशीगंध ही फुलशेती केली आहे या माध्यमातुन त्याना एकरी एका वर्षात दोन ते तिन लाखाचे उत्पन्न होत आहे आठवड्या निघाणारे त्याच्या फुलाला मार्कट मध्ये चांगली मागणी असल्याने महीन्या काठी उत्पन्न येत आहे या सोबतच त्यानी शेतात आरोग्य करीता हितकारक असलेल्या काळा गव्हाचे पेरणी केली आहे. या काळ्या गव्हा मुळे मधुमेह,कॅन्सर हुदय रोग या सारख्या दुर्धर आजारा पासुन बचाव होत आहे महाराष्ट्र वगळता पंजाब हिमाचल राजस्थान या प्रदेशात काळा गव्हाचा मोठ्या प्रमाणात पेरा असतो राज्यात अद्याप काळा गव्हाचा चलन नाही परंतू विलास मेतकर यांनी या वर्षी काळा गहु पेरणाचा प्रयोग केला आहे.
या वर्षी त्यानी दोन एकर मध्ये काळा गव्हाची पेरणी केली आहे. काळा गहु हा रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर आदी दुर्धर आजारावर गुणकारी असुन त्याच्या काळा गव्हाला चांगली मागणी असल्याचे त्यानी सांगीतले या सोबतच फुलशेतीच्या माध्यमातुन त्यानी चांगले उत्पन्न निळवले आहे अकोला येथील फुल मार्वेâट मध्ये शेतातील फुले विक्री करीता आणल्या जात असल्याने पिकावर उत्पन्ना करीता आठ ते नऊ महिने थाबण्याची गरज नसुन दरोरोज फुल शेती मधुन उत्पन्न मिळत असल्याचे त्यानी सांगीतले.
चौकट – आपल्या कडील शेतकर्यानी केवळ पारपांरीक शेतीवर अवलबुन न राहता आठवड्याला आर्थिक उत्पन्न मिळणारे शेती व्यवसाया कडे शेतकर्यानी वळणे गरजेचे आहे या सोबतच काळा गव्हाची माहीती घेवुन आरोग्या करीता लाभदायक असलेल्या काळा गव्हाची पेरणी केली असुन कमी खर्चात हे पिक येत असुन बाजारात चांगली मागणी आहे – विलास मेतकर शेतकरी चिखलगांव