छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विधवा महिलांना साडी मास्क व सॅनिटायझर वाटप करून अभिप्रेत अभिवादन…

- संघटित विद्यार्थी कृती समिती द्वारा अभिनव उपक्रम-
अविनाश पोहरे – संपादक
अकोला – रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या जयंतीनिमित्त संघटित विद्यार्थी कृती समिती द्वारा विधवा महिलांचा सन्मान पर उपक्रम राबविण्यात आला.व त्याचे औचित्य साधून कोरोना नियमांचे पालन करून शिवाजी महाविद्यालयाच्या बाजूला असलेल्या मंदिराजवळ फिसिकल अंतर चे पालन करून हा कार्यक्रम राबविण्यात आला ह्यावेळी विधवा महिलांना साडी,मास्क व सॅनिटायझर व रोगप्रतिकारक शक्ती काळा इत्यादी वाटप करण्यात आला.व नागरिकांना सुद्धा मास्क व सॅनिटायझर वाटण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन आकाश हिवराळे जिल्हासंघटक रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद, अकोला व नीरज बडगे एन.एस.यु.आय. महानगर अध्यक्ष अकोला ह्यांनी केले. होते तरी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुणाल मेश्राम, रोहन बुंदेले,सुमय्या अली,साहिल सप्रे, अंकुश गावंडे, सचिन काळे, प्रहार सेवक अमोल करवते, हरिष गुडधे, रोहित गुप्ता, सागर सप्रे,शुभम कोहड, आदींनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.