ताज्या घडामोडी

अकोल्यात सेव्ह माय फर्स्ट व्हॅलेंटाईन हे एक अनोखे आंदोलन शांततेत संपन्न.

शेतकरी जागर मंच मागील सात वर्षांपासून शेतकऱ्यांचा प्रश्नावर अत्यंत ठाम भूमिका

अविनाश पोहरे – संपादक

अकोला – व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने शेतकरी जागर मंच च्या शेतकरी पुत्रांनी अकोल्यात सेव्ह माय फर्स्ट व्हॅलेंटाईन हे एक अनोखे आंदोलन अत्यंत शांततेने केले व त्या दरम्यान नवीन शेतकरी कायद्याना असलेला विरोध दाखविला. आता शेतकरी पुत्र कायद्याचा विरोधात रस्त्यावर उतरले व टप्प्याटप्याने ते आपले आंदोलन अधिक तीव्र करतील असे या दरम्यान तरुण शेतकरी पुत्रांनी सांगितले. जगभरा मध्ये तरुणाई हा प्रेमाचा उत्सव साजरा करीत असताना अकोल्यातील तरुण मात्र हातात काटेरी गुलाब घेऊन आपल्या व्हॅलेंटाईनसाठी रस्त्यावर उतरलेले दिसले. शेतकरी जागर मंच मागील सात वर्षांपासून शेतकऱ्यांचा प्रश्नावर अत्यंत ठाम भूमिका घेत आहे व त्याच कडीतील पुढील टप्पा म्हणजे हे आंदोलन होय. आजच्या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण तरुणाई ने आंदोलनाचे आयोजन, नियोजन व सहभाग होय. कोणत्याही प्रकारच्या राजकीय घोषणा न देता फक्त आपल्या बापाच्या संघर्षाचा विजय व्हावा या एकाच हेतूने तरुणाई रस्त्याचा दोन्ही बाजूने असलेल्या दुकानदार व नागरिकांना प्रेमाचा संदेश देत शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्यासाठी आग्रही भूमिका मांडताना दिसले. शहराच्या मध्यवर्ती महात्मा गांधी मार्गापासून सुरू झालेल्या आंदोलनास नागरिकांनी सुद्धा समर्थन दिले. आंदोलना दरम्यान तरुणाईने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यलयात जाऊन तेथे उपस्तित स्वयंसेवकाना शुभेच्छा पत्र व गुलाब पुष्प देऊन नम्रपणे शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्याकरिता केंद्र सरकारला प्रभावित करण्याची विनंती करण्यात आली. मार्गातील भाजपा च्या जिल्हा कार्यालयात सुद्धा अश्याच प्रकारे शेतकरी जागर मंचाच्या तरुणाई ने गांधीगिरी केली. आंदोलनाच्या मार्गातील जुने बसस्टँड ,नवीन बसस्टँड व जिल्हाधिकारी निवास या ठिकाणी सुद्धा आपले म्हणणे मांडत शेतकरी जागर मंचाची तरुणाई आपल्या निवेदनासह अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना भेटले.आंदोलनातील सर्व सहभागी शेतकऱ्यांचा मुलामुलींनी आपले गाऱ्हाणे सरकार समोर मांडले व सरकारला ईशारा सुद्धा दिला की आमच्या मार्गातील खिळ्यांचे भाले झाल्यास त्याची संपुर्ण जवाबदारी सरकारची असेल त्याची जाणीव प्रशासनाने ठेवावी. या सम्पूर्ण भारत देशात आपल्या प्रेमासाठी संघर्षाची भूमिका अश्या प्रकारे फक्त अकोल्यातील शेतकरी जागर मंचच्या तरुण सहकाऱ्यांनी मांडली व खऱ्या अर्थाने भविष्यात काय मांडून ठेवले आहे याची जाणीव आम जनतेला करून दिली. आंदोलनाच्या पुढील टप्यात किसान कैफियत ही शेतकऱ्यांची महापंचायत शनिवार दि 20 फेब्रुवारी 2021 रोजी अकोल्यातील खुले नाट्य गृह येथे दुपारी 02:00 वाजता करण्यात आली आहे. या महापंचायतीस शेतकऱ्यांनी व नागरिकांनी मोठ्या हजर राहावे असे आवाहन करण्यात आले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: