…आणि मी कोरोनाला हरवलं…!

“मी राजेंद्र मारुती गायकवाड (वय ६० वर्षे) मला तब्येतीचा त्रास जाणवत होता. मी कोरोनाची तपासणी केली असता पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. त्यानंतर उपचारासाठी मला पुण्यातील जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. दरम्यान मधुमेहाचाही त्रास जास्त जाणवू लागला होता. त्यामुळं प्रतिकारशक्ती कमी झाली आणि अशक्तपणाही जास्त जाणवू लागला. परंतु हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी योग्य उपचार केल्यामुळं तसचं नाश्ता आणि जेवण दररोज वेळेत व चांगल्या दर्जाचे दिल्यामुळं माझ्या प्रकृतीत सुधारणा झाली. तब्येत ठीक झाल्यानंतर ११ डिसेंबर २०२० ला हॉस्पिटलमधून घरी सोडलं. दि. २४ नोव्हेंबर २०२० रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यापासून ते ११ डिसेंबर २०२० ला डिस्चार्ज मिळेपर्यंत महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मला सर्व उपचार मोफत मिळाले. आणि मी करोनाला हरवलं.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळाल्याबद्दल मी राज्य शासनाचा आभारी आहे. तसेच जम्बो कोव्हिड हॉस्पिटल व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा सर्व स्टाफ यांनी मला मोलाचे सहकार्य केलं. मी डॉक्टर, नर्स व इतर स्टाफ यांचाही मनापासून आभारी आहे. ही योजना अनेक लोकांपर्यत पोहोचावी व लोकांना या योजनेचा लाभ मिळावा अशी इच्छा व्यक्त करतो.