पातूर तालुक्यातील पत्रकार बांधवांसाठी पत्रकार कक्ष उपलब्ध करून द्यावे.

सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार बायस यांची निवेदना द्वारे मागणी
अकोला एक्सप्रेस न्यूज नेटवर्क
पातूर:- पातूर तालुक्यातील पत्रकार बांधवांसाठी पत्रकार भवन तथा पत्रकार कक्ष उपलब्ध करून द्यावे अशा प्रकारची मागणी पातूर तालुका विकास मंचाचे संयोजक तथा सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार बायस यांनी पातूर तहसील किंवा पातूर नगर परिषद ला पत्रकार भवन तथा पत्रकार कक्ष उपलब्ध करून देणाची मागणी करण्यात आली.पातूर शहर हे तालुक्याचे ठिकाण आहे या शहराची लोकसंख्या साधारण साठ हजार च्या जवळपास आहे शहरात चाळीस च्या वर खेडे गावातील नागरिक सरकारी कामे, शाळा, कॉलेज, व्यवसायासाठी नेहमी ये जा करतात या ठिकाणी दिवाणी व फौंजदारी न्यायालय, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, जिनिंग फॅक्ट्ररी , शाळा महाविद्यालय आहेत येथील नागरिकांच्या समस्या शासनाच्या निर्देशनास आणणे, शासनाच्या योजना शास नाचे धोरण वेगवेगळ्या लोकउपयोगी जनहिताच्या जाहिरात वेळोवेळी नागरिकांपर्येंत पोहचविण्यासाठी मीडिया हा अतिशय महत्वाचं घटक आहे या माध्यमातून प्रत्येक घटकासाठी शासनाच्या नियमानुसार आपल्या कार्यालयाच्या इमारती मध्ये पत्रकार कक्ष उपलब्ध करून द्यावे अशी मागणी या निवेदन द्वारे करण्यात आली जेणेकरून प्रत्येक पत्रकार बांधवाला त्याच्या कामकाजसाठी हक्काचे कार्यालय उपलब्ध होईल.
पातूर तालुक्यातील पत्रकारांसाठी खरंच पत्रकार कक्षाची गरज आहे मी पातूर नगर परिषद कडून सर्वतोपरी प्रयत्न करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल.
सोनाली यादव
मुख्याधिकारी नगर परिषद पातूर