ताज्या घडामोडी
नगर परिषद बाळापूर येथे बचत गटाचे एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन.

नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी
बाळापुर दि 17/12/ 2020 गुरुवार रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ अकोला द्वारा संचालित,स्वदीप लोकसंचलित साधन केंद्र,अकोला नाबाड, यांच्या संयुक्त विद्यमानाने बाळापूर शहरात बचत गटाचे एक दिवस प्रशिक्षणाचे आयोजन बाळापुर नगर परिषद येथे संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती माननीय वाळके सर, जिल्हा विकास प्रबंधक नाबाड,अकोला. माननीय मुख्याधिकारी पवार साहेब, नगरपरिषद बाळापूर. स्मिता कांबळे, कादरी साहेब, मा.तायडे सर, मा.सुरेखा सर,भावना चव्हाण,सीमा भालतीलक यांची व बाळापुर शहरातील सर्व बचत गटातील महिलांची उपस्थिती होती.सदर कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शन स्मिता कांबळे यांनी करून, संचलन व आभार प्रदर्शन अस्मिता वानखडे यांनी केले.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.