जे नेदरलॅंडच्या डॉक्टरांना जमले नाही ते ऐरोलीतील डॉक्टरांनी केले

- रुग्णाचे नाक न कापता दुर्बिणने यशस्वी शस्त्रक्रिया
अनंतकुमार गवई
नवी मुंबई, प्रतिनिधी
ऐरोली सेक्टर-3 परिसरात मागील तीस वर्षापासून वैद्यकीय सेवेमध्ये आधुनिक प्रणालीचा वापर करून रुग्णालयात उपचार करण्यात यशस्वी ठरलेल्या संजीवनी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी एका रुग्णावर परदेशातील डॉक्टरांना न जमलेली शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली आहे.
ऐरोली सेक्टर 3 परिसरात राहणारे अमोल पालवे हे परदेशातील नेदरलॅंड इथे नोकरी निमित्ताने वास्तव्यास आहेत. मागील काही महिन्यांपासून त्यांना नाक आणि डोळ्याच्या मध्यभागातील श्वासन मार्गावर चामखीळ आल्याने श्वास घेण्याचा त्रास होता त्याच प्रमाणे त्यांना सातत्याने सर्दी डोळ्यातून पाणी येणे व एलर्जी याने त्रस्त केले होते. नेदरलँड येथे राहत असल्याने तेथील डॉक्टरांना उपचार करण्याकरिता अमोल पालवे यांनी होत असलेल्या त्रासाची माहिती दिली मात्र त्यावेळी त्यांना येथील डॉक्टरांनी घाबरून सोडत ओपन सर्जरी (open surgery) करावी लागेल असे सांगितले कोरोनाच्या लॉक डाऊनमुळे पालवे आपल्या मूळनिवासी ऐरोली येथे आले. मात्र त्यांना होणारा त्रास हा अधिकच वाढत चालला होता. अधिक त्रास होत असल्याने पालवे यांनी संजीवनी रुग्णालयात डॉक्टरांची भेट घेतली. डॉक्टर तुषार गोरे आणि डॉक्टर अतुल पाटील यांना होत असलेल्या त्रासाची माहिती दिली.या दोन्ही डॉक्टरांनी विविध चाचण्या करून दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला तब्बल 5 तासाच्या शस्त्रक्रियेनंतर अमोल पालवे यांच्या नाकातील श्वसन मार्गात अडथळा ठरत असणारी चामखीळ काढून टाकण्यात आली दोन्ही डॉक्टरांच्या अभ्यासपूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पालवे यांच्यावर उपचाराकरिता नाक कापण्याची आलेली नामुष्की संपली आहे. या उपचाराचे कायम निदान करण्यासाठी डॉक्टर तुषार गोरी आणि डॉक्टर अतुल पाटील प्रयत्नशील आहेत. ही शस्त्रक्रिया संजीवनीच्या ऑपरेशन थेटरमध्ये पार पडली. अमोल पालवे यांनी संजीवनीचे सगळे डॉक्टर्स, नर्स,व स्टाफ यांचे आभार मानले आहे.