तेल्हारा तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी…

२३ डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल
कागदपत्रे जुळवाजुळवी उमेदवारांची दमशाक
निवडणुकीच्या गावांमध्ये राजकिय वातावरण तापले
गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी वाढली असून २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर रोजी पावतो उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असल्याने तहसिल कार्यालयावर कागदपत्राची जुळवाजुळव करण्यासाठी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली आहे तेल्हारा तालुक्यातील ३४ ग्रामपंचायत मध्ये पुरूष मतदारांची संख्या ४२१३३ असुन महीला मतदान संख्या ३७११७ असे एकुण ७९२५१ मतदान मतदानाचा हक्क बजावनार आहे अनेक उमेदवारांकडे राष्ट्रीय कृत बैकेचे खाते नाहीत त्यामुळे त्यांना अगदी वेळेवर खाते काढण्याबाबत बजावण्यात आल्याने त्यांनी प्रभारी तहसीलदार राजेश गुरव यांच्याशी संपर्क केला असता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे खाते असले तरी चालेल असे तोंडी सांगण्यात आले परंतु निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तसे लेखी आदेश न दिल्याने ऐन वेळी उमेदवाराची फजिती होते की काय यांची अनेकांना धाकधुक वाटत आहे सांगितले आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लागणारे कागदपत्रे करण्यासाठी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी सेतु केंद्रावर रांगा लावल्या आहेत गाव पातळीवर अतिशय महत्त्वपुर्ण समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीने तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे या निवडणुकीत विविध पक्षांना ग्रामपंचायती आपल्या कडे घ्यावयाच्या असल्याने या निवडणुकीला रंगत आली आहे.
या निवडणुकीत विविध कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना निवडणुकीत कामाला लावले आहे आधीच स्वताच्या कार्यालयाचा पदभार आणि त्यात निवडणुकीचा ताण त्यामुळे विविध कार्यालयात सुकसुकाट निर्माण झाला आहे. सिरसोली, तळेगाव वडनेर,सौदळा,वाकोडी,दानापुर, हिवरखेड, हिंगणी बु,रायखेड,भाबेरी,तुदगाव, थार,गोर्धा, खंडाळा, शिवाजी नगर,अडगाव,पिवदळ खुर्द,नेर ,कारर्ला बु ,खेलदेशपाडे, वडगांव रोठे, आडसुळ,चागलवाडी,बेलखेड वागरगाव, मनब्दा, घोडेगाव वरुड बु,राणेगाव ,जस्तगाव,नरशीपुर,खेलसटवाजी,अटकळी,इसापुर वाडी अदमपुर या ग्रामपंचायती निवडणूक मैदानात आहेत. तेल्हारा तालुक्यातील दानापुर हिवरखेड बेलखेड हया तिन मोठ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत रिंगणात असुन त्या ठिकाणी चांगलीच रंगत आहे कुठे दोन तर कुठे तिन तर कुठे चार पनल मधुन ही निवडणूक लढविऱ्या जावु शकते या वेळी कोणत्याही गावची निवडणूक अविरोध होण्याचे आज तरी चिन्हं दिसत नाही.