ताज्या घडामोडी
बुलढाणा येथे एस टी महामंडळाच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

मुंबई, दि. 15 : बुलढाणा जिल्ह्यात राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थान असल्याने विशेष बाब म्हणून बुलढाणा येथे एसटी महामंडळाच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारणार, अशी माहिती परिवहनमंत्री ॲड.अनिल परब यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.