मा.केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

योगेश धानोरकर यांच्या नेतृत्वात रक्तदान शिबिराचे आयोजन
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी सुकांत वंजारी
यवतमाळ दि.२० डिसेंबर -: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतिने
मा.केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त यवतमाळातील लोहारा येथील गंगाकाशी लाॅन मध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले त्यामध्ये मोठ्या प्रमाणात युवकांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान केले.गेल्या काही वर्षांत विदर्भासह महाराष्ट्राच्या विविध सामाजिक संस्थांतर्फे रक्तदान शिबिरे आयोजित केली जात असली तरी त्यातून पाहिजे त्या प्रमाणात रक्तदान होत नाही.आज देशात १३० कोटी लोकसंख्येवर असून केवळ १ कोटी २० लाख लिटर रक्त पुरवठा केला जात आहे.गेल्या वर्षी ७४ लाख युनिट रक्त उपलब्ध झाले होते.आवश्यकतेनुसार ४० टक्के रक्ताची कमी होती.रक्त न मिळाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण देशभरात १५ ते २० टक्के आहे.भारतात केवळ ०.६ टक्के लोक रक्तदान करतात.विदर्भात १० हजार लिटर रक्ताची आवश्कता आहे मात्र,त्या प्रमाणात पुरवठा होत नाही.खाजगी रुग्णालयांमध्ये रक्ताची आवश्यकता असताना त्यांच्याकडे तेवढा साठा उपलब्ध नसल्याचे एका सर्वेक्षणानुसार लक्षात आले आहे.साधारणत १८ ते ६५ या वयोगटातील लोकांना रक्तदान करता येऊ शकते.ज्यांचे वजन साधारणत ७४ किलो आहे त्यांच्या शरीरात ५ लिटर रक्त असते.आज आपण कितीही विकसित झालो असलो तरी कोणीही रक्ताच्या कारखान्याची निर्मिती करू शकले नाही.शासकीय पातळीवर रक्तदान संदर्भात जागृती केली जात असली तरी त्या प्रमाणात रक्तदाते मात्र समोर येत नाही.
मात्र रक्ताचा तुटवडा लक्षात घेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मा.केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार साहेबांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ८० हजार लिटर रक्ताच्या बाॅटल संकलनाचे उद्दीष्ट ठेवत संपुर्ण महाराष्ट्र भर राष्ट्रवादी पक्षाच्या वतिने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.याच अनुषंगाने यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतिने योगेश विनायक धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे लोहारा रोड वरिल गंगाकाशी लाॅन मध्ये आयोजन करण्यात आले होते या शिबिरात ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले असुन रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष ख्वाजा बेग यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ख्वाजा बेग,राजुभाऊ जॉन,उत्तम गुल्हाणे,हरीश कुडे,मनोज डोईजड,सतीश मानधना,आकाश चंदनखेडे,पराग पाटील,अमन चौधरी,नयन लुंगे,सागर बोबडे,सुप्रीत गणवीर,चंद्रशेखर भीमटे,गोपाल निरटकर,बालू रोकडे,सुमित लांडगे,प्रशांत किर्दक आदी उपस्थित होते.