ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडूण येणाऱ्यास पातुर तालुका विकास मंच करणार यथोचित सन्मान

अकोला एक्सप्रेस न्यूज नेटवर्क –
पातुर तालुक्यातील असणा-या ग्रामपंचायतीच्या निवडणुका येणा-या काही दिवसात होवू घातलेल्या आहेत या निवडणुकीत जे कोणी ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून येतील त्या सन्माननीय विजयी सदस्यांना
पातुर तालुका विकास मंचच्या वतीने
१) भारताचे संविधान हे पुस्तक..
२) मिसाईल मॅन राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे अग्निपंख पुस्तक..
३) मृत्युंजय कादंबरी..
४) ययाती कादंबरी..
५) स्वामी विवेकानंद आत्मचरित्र पुस्तीका..
आणी हिंदूसुर्य महाराणा प्रतापसिंह, छत्रपती शिवाजी महाराज,भगवान गौतमबुद्ध यांच्या जन्मस्थळाची पवित्र माती एका मंगल कलशा सोबत एक गोल्ड मेडल देण्यात येईल
उद्देश
१) निवडणुक प्रक्रीया सुलभ करणे.
२) एकमेकांत उद्धभवणारी द्वेष भावना नाहीशी करणे.
३) माणसा-माणसातील एकमेकांत असणारा आपसातातील विरोध कायमचा नाहीसा करून सदृढ विचारांची आदान प्रदान करणे.
४) एकमेकांतील अहंमभाव काढूण गलिच्छ राजकारणाला हद्दपार करून विकासात्मकतेच्या राजकारणाची पायाभरणी करणे व गावासोबत तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यावर भर घालणे.
५) उमेदवाराचा निवडणुक खर्च शुन्य करून त्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविने.
६) वार्डात नेहमी हसत खेळीचे वातावरण निर्माण करून सामान्य नागरीकांना पाहीजे असलेला मोकळा श्वास तयार करणे.
७) सामान्य नागरीकांच्या मुलभुत गरजा रस्ते,लाईट,पाणी,बंदीस्त ड्रेनेज,क्रिडांगण,गार्डन,शाळा, महाविद्यालय,गावाला विजमुक्त करण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पाची निर्मिती,नदी नाले यांच्यावर छोटे छोटे बंधारे बनविने,
जगाच्या कानाकोप-यात काय चालू आहे त्याची माहीती नागरिकांना बघता यावी यासाठी दररोज ठराविक काळात मोफत इंटरनेट सेवा,तरूण/तरूणींसाठी अद्यावत व्यायामशाला,जलतरण तलाव,गावाच्या सार्वजनिक मध्यभागाच्या ठिकाणी प्रत्येक नागरिकाचे घराचे,मंदीराचे,शाळा, महाविद्यालय, ऐतिहासिक स्थळाचे लोकेशन,गल्ली क्रमांक,रस्ता,रस्त्यांचे नावे अशाप्रकारचा नकाशा बनवून तो एका मोठ्या बोर्डवर लावणे.छोटे मोठे लघु व गृह उद्योग व्यवसाय यांचा अभ्यास करून निर्मिती करणे,महिलांच्या सक्षमिकरणासाठी बचत गटांची स्थापना करणे.शासनाच्या प्रत्येक योजना सर्व सामान्य नागरिकां पर्यंत पोहचवणे तशा त्या गावातील मध्यभागी प्रकाशित करणे
इत्यादी प्रकारच्या कामांसाठी आपल्या उमेदवाराला लढण्यासाठी बळ देणे जेणे करून गाव व देश सुजलाम सुफलाम होवून स्वयंपुर्ण व सक्षम होईल.
८) सुशिक्षित हुशार धर्मनिरपेक्ष भावणेने काम करणारा उमेदवार गावाला लाभावा.
सर्व समाजसेवक व राजकीय लोकांना विनंती आहे की होऊ घातलेल्या निवडणुकीत सर्वांनुमते गावपातळीवर आदर्शवादी व क्रांतिकारक बदल करून उमेदवार बिनविरोध निवडून द्यावे हेच आव्हाहन आणी प्रामाणिक प्रयत्न
प्रजा खुश तो राजा खुश
असं वातावरण निर्माण व्हावं
यासाठी पातुर तालुका विकास मंच
सदैव कटीबद्ध आहे व राहील
जय हिंद..
आयोजक
पातुर तालुका विकास मंच
कार्यालय संभाजी चौक,बाळापुर रोड, पातुर, जिल्हा – अकोला ४४४५०१