फॅशनच्या युगात धोतर झाले कालबाह्य

प्रशांत चिंचोळकर
ग्रामीण प्रतिनिधी सिरसो मुर्तीजापुर
सृष्टी वर मानवाची निर्मिती झाली. तेव्हा सर्वप्रथम अंग झाकण्यासाठी मानवाने वृक्षाचा वापर सुरू केला. कालांतराने वृक्षाच्या सालीपासून वस्त्र निर्माण केले. त्यानंतर वृक्षाच्या विविध पानापासून वस्त्राची निर्मिती केली. जसजशी मानवाची प्रगती झाली तस-तशी पुरुषाच्या पोशाख व खाद्य पदार्थ बदलून गेले. कापूस, रेशम या धाग्या पासुन बनलेल्या वस्त्राची निर्मिती झाली. त्या काळात धोतर व शर्ट वापरण्याची पद्धत रूढ झाली. बंगाली कुर्ता हे वस्त्र मनुष्य वापरायला लागले तर स्त्रियांसाठी लुगडं, चोळी अशाप्रकारे पोशाख स्त्री पुरुष वापरू लागले. त्यानंतर साडी व पायजामा युग सुरू झाला. आता आधुनिक फॅशनेबल काळात जीन्स, सलवार, सूट, असा युग आलेला दिसत आहे. पूर्वीच्या काळातील शाळेत जाणारा विद्यार्थी फाटक्या कपड्या चा थिगड्याना शिवून शाळेत जात असायचा .व आपले शिक्षण पूर्ण करायचा परंतु आधुनिक युगातील फॅशनेबल विद्यार्थी नवीन नवीन कपडे घेऊन जीन्स घालत आहे. या फॅशनेबल च्या युगात पूर्वीचा पोशाख कालबाह्य झालेला आहे.