आपआपल्या भागातील सर्वच ग्रामपंचायती आपले उमेदवार उभे करा ! मनसे अध्यक्ष राज ठाकरे
राज्यातील सर्वच मनसे जिल्हाध्यक्ष,उपजिल्हा अध्यक्ष व तालुका अध्यक्षांना कृष्णकुंज वरुन आले आदेश
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी सुकांत वंजारी
यवतमाळ -: संपुर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणुक आयोगामार्फत जाहिर करण्यात आले असुन येत्या काही दिवसात उमेदवार दाखल करण्यास सुरुवात होणार असल्याने राज्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत आपआपल्या भागातील सर्वच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आपले उमेदवार उभे करा असा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पत्रकाव्दारे मनसेच्या सर्व जिल्हाध्यक्षांना दिला आहे.त्यामुळे मनसेही या निवडणुकीत ताकदीने उतरणार असल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यातील महाविकास आघाडी,भाजप,वंचित बहुजन आघाडीपाठोपाठ आता मनसेनेही ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व जिल्हा अध्यक्ष,उपजिल्हा अध्यक्ष,तालुका अध्यक्षांना एका पत्रकातुन आपण ज्या उमेदवारांना उमेदवारी देणार आहात त्यांच्या नाव,गाव,पत्ता,तसेच मोबाईल नंबर वार्ड निहाय यादी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात पाठवण्याच्या सूचनाही या पत्रकातुन देण्यात आल्या आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेना या निवडणुका पूर्ण ताकदीनं लढवण्याच्या सूचनाही राज यांनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.त्यामुळे मनसेही या निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत येणार असल्याचं बोललं जात आहे.