स्व.रामदासजी घटाळे पुण्यस्मरण दिनानिमित्त मुख्याध्यापक सुभाषराव घटाळे परिवार कडून रुग्णांना भोजनदान

डॉ.संदीप सुशिर
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
अचलपूर तालुक्यातील सुलतानपूर येथील रहिवासी व हल्ली मुक्काम कठोरा नाका, फ्रेंड्स कॉलनी,इच्छामणी गणपती मंदिरासमोर अमरावती व जि.प.उच्च प्राथमिक शाळा तळणी पूर्णा ता.चांदूरबाजार जिल्हा अमरावती चे मुख्याध्यापक श्री.सुभाषराव रामदासजी घटाळे व शिक्षिका सौ.अलकाताई सुभाषराव घटाळे यांच्यातर्फे त्यांचे वडील समाजसेवक स्व.रामदासजी मारोतराव घटाळे यांच्या पुण्यस्मरण स्मृतिदिना निमित्त ग्रामीण रुग्णालय अचलपूर येथे रुग्णांना व गोरगरिबांना भोजनदान देण्यात आले आहे. सदर उपक्रम मुख्याध्यापक श्री.सुभाषरावजी घटाळे व त्यांच्या अर्धांगिनी सौ.अलकाताई सुभाषराव घटाळे ह्या दरवर्षी पुण्यस्मरण स्मृतिदिन निमित्त भोजनदान कार्यक्रम राबवित असतात तसेच दोघेही दांपत्य सुस्वभावी शांत मनमिळावू वृत्तीचे सुस्वभावाचे असल्यामुळे त्यांचा शाळेतील इतर शिक्षकांशी विद्यार्थ्यांशी व पालकांशी तसेच जनतेशी बऱ्याच चांगल्या प्रकारचा परिचय आहे. त्यांच्या या सतकार्यामुळेच नातेवाईक व मित्रपरिवार यांच्यामध्ये त्यांच्याबद्दल कौतुकाची व आपुलकीची भावना असून दोघांचेहि कौतुक करावे तेवढे कमीच आहे.त्यांचे वडील समाजसेवक स्व.रामदासजी मारोतराव घटाळे यांच्या पुण्यस्मरण स्मृतिदिना निमित्त भोजनदान करून सर्वांच्या वतीने त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात येत आहे.