अकोला ते विवरा एसटी बस ” लाल परी ” उद्यापासून नियमित सुरू

निलेश किरतकार
मुख्य संपादक
अकोला : गेल्या सात ते आठ महिन्यांपासून कोरोना संक्रमनामुळे राज्यातील एसटी प्रवास सेवा प्रभावित झाली होती. परंतु जनसामान्य प्रवाश्यांची हक्काची “लाल परी ” आता पूर्वपदावर येऊन आता पुन्हा एकदा प्रवाश्यांच्या सेवेत दाखल झाली आहे. अकोला आगर क्रमांक 1 ची असलेली अकोला ते विवरा ही बससेवा उद्यापासून प्रवाश्यांच्या सेवेत दाखल होत आहे.
अकोला ते विवरा ही फेरी पुढीलप्रमाणे असेल :
◆ दुपारी 1 वाजता ही अकोला ते पांगरताटी निघेल
मार्गे : कापशी , चिखलगाव , पातूर , बाभूळगाव , विवरा फाटा , आलेगाव , मळसुर , पांगरताटी
◆ पुन्हा हीच बस पांगरताटी येथून अकोल्यासाठी मार्गक्रमन करेल आणि सायंकाळी सात वाजता अकोला येथे पोहोचेल.
◆ अकोला येथून हीच बस परत पांगरताटी साठी मुककमी जाईल.
◆ दुसऱ्या दिवशी हीच बस सकाळी पांगरताटी येथून अकोला साठी ( दिलेल्या मार्गे ) निघणार आहे.
◆ सकाळी हीच बस 8 वाजता अकोल्यात पोहोचेल
◆ नंतर लगेच च हीच बस अकोला ते विवरा ( मार्गे कापशी , माझोड , तांदळी , बाभूळगाव , जांभरून ) आगार क्रमांक 1 येथून 8:40 निघेल आणि 10 वाजता विवरा वासीयांच्या सेवेत दाखल होईल.
या बस सेवेच्या प्रवासाचा प्रवाश्यांनी लाभ घ्यावा , असे आवाहन अकोला आगार क्रमांक 1 ने केले आहे.