ताज्या घडामोडी

उमरखेड नगरपरिषदे अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेत घोटाळा करणाऱ्यावर ४२० कलमान्वये गुन्हे दाखल करा ! राहूल गांधी विचार मंचची मागणी.

जिल्हाधिकारी यांना केले निवेदन सादर 

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी सुकांत वंजारी

यवतमाळ दि.२३ डिसेंबर -: उमरखेड नगरपरिषदच्या वतिने पंतप्रधान आवास योजना राबविण्यात आली असुन त्या योजनेच्या लाभार्थांकडुन प्रति लाभार्थी कडुन २९ हजार रुपये उकळले असुन हा मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे.नगर परिषदेमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या रकमेत अफरातफर करणाऱ्यावर ४२० कलमान्वये गुन्हे दाखल करा अशी मागणी राहुल गांधी विचार मंचच्या वतिने निवेदनतुन करण्यात आले.उमरखेड येथील नगर परिषदेसमोर गेल्या सात दिवसांपासून प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना आमरण उपोषण सुरू केले असून पंतप्रधान आवास योजनेच्या रक्कमेत मोठ्याप्रमाणात अफरातफर झाल्याने राहुल गांधी विचार मंचच्या महिला प्रदेशाध्यक्षा प्रा.डॉ.मीनाक्षी सावळकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.या निवेदनातून मागणी करण्यात आली की पंतप्रधान आवास योजनेत योजनेमध्ये घोटाळा करणाऱ्या संबंधितावर ४२० चा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी राहुल गांधी विचार मंचच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या मिळणाऱ्या अनुदानातून नगरपालिका प्रशासन मुख्याधिकारी व बँक व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संगमतावरून ९० लाभार्थ्यांच्या खात्यातून प्रति लाभार्थी २९ हजार रुपये कोणत्याही लाभार्थ्याचे परवानगी न घेता कोणत्याही विड्राल स्लीपवर सही न घेता परस्पर काढण्याचा धक्कादायक प्रकार उमरखेड नगर परिषदेच्या वतीने करण्यात आला.या विरोधात उमरखेड नगरपरिषदे समोर उपोषण सुरू असुन काही व्यक्तींचे उपोषणाला बसलेल्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचाराकरिता दाखल करण्यात आले.त्यामुळे उपोषणकर्तांची मागणी पुर्ण करुन उपोषण सोडविण्यासाठी तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या रकमेत अफरातफर करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी राहुल गांधी विचार मंचच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.निवेदन सादर करतांना राहुल गांधी विचार मंचच्या महिला प्रदेशाध्यक्षा प्रा.डाॅ.मीनाक्षी सावळकर,यवतमाळ नगरपरिषदेचे विरोधी गट नेता चंद्रशेखर चौधरी,राहुल गांधी विचार मंचचे जिल्हाध्यक्ष सुकांत वंजारी,अजय किन्हीकर,उमेश इंगळे,महिला जिल्हाध्यक्षा प्रियंका बिडकर,जिल्हा उपाध्यक्षा संजीवनी कासार,शहर काँग्रेसचे सरचिटणीस डाॅ.सचिन येरमे,राहुल गांधी विचार मंचचे कार्याध्यक्ष किशोर कुळसंगे,उमरखेड नगर सेविका कविता राहुल काळबांडे,नगरसेविका कल्पना शैलेश अनखुळे,नगर सेविका रुपाली गजानन रासकर,अशोक जाधव,आदी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: