पार्डी रस्त्यावर झुडूप व खड्यांचे साम्राज्य
अविनाश पोहरे / अकोला एक्सप्रेस न्यूज नेटवर्क, पातूर
पातूर तालुक्यातील ग्राम आगीखेड पार्डी रोडचे दोन्ही बाजूने काटेरी झुडपे वाढली असून रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे तरी हा रोड जि. प.बांधकाम विभाग अंतर्गत येत असून झुडपाने रोडचा अर्धा भाग दिसेनासा झाला आहे व त्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असून अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.त्यातच पातूर शहराकडे येण्यासाठी पार्डी वासीयांना हा एकमेव रोड असून तहसील,पं. स.,बँक अथवा वैद्यकीय उपचार व इतर कामाकरिता ग्रामस्थांना येणे जाणे करावे लागते.त्यामुळे एखादा मोठा अनुचित प्रकार घडण्याची वाट बघण्यापेक्षा ह्या सर्व बाबींची गांभीर्याने दाखल घेऊन जि. प.बांधकाम विभागाने दाखल घ्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आकाश हिवराळे ह्यांनी केली असून दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा ईशारा दिला.