डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख ह्यांची १२२ वी जयंती उत्साहात साजरी

अकोला एक्सप्रेस न्यूज नेटवर्क / पातूर
शिक्षणमहर्षी कृषिरत्न डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख ह्यांची १२२ वी जयंती आजी माजी विद्यार्थी ह्यांच्या वतीने पातूर येथील डॉ.एच एन. सिन्हा महाविद्यालयात स्थित डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती उद्यान मध्ये त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दिप प्रज्वलित करून साजरी करण्यात आली. ज्या महापुरुषामुळे असंख्य बहुजनांच्या गोर गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दरवाजे उघडे झाले त्या महापुरुषांना शतशः नमन करून पुढील वाटचाल विद्यार्थी दशेत चालू ठेवावी व आपले शिक्षण पूर्ण करावे असे प्रतिपादन ह्यावेळी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे जिल्हासंघटक व आजी विद्यार्थी आकाश हिवराळे ह्यांनी केले ह्यावेळी ईगल ग्रुप चे अध्यक्ष सागर इंगळे,अकोला एक्सप्रेस न्यूज चे संपादक अविनाश पोहरे,प्रहार सेवक अमोल करवते,धनंजय सरदार,सुनिल बग्गन,सोनू किरतकार कर्मचारी शंकर ताले ह्यासह असंख्य आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.