पिंपळखुटा येथे नर मादी बिबट्याचा मृत्यू

सुकलाल उपर्वट / देऊळगाव
दि. 24 डिसेंबर पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन च्या हद्दीत येत असलेल्या पिंपळखुटा ते राहेर रस्त्यावरील शेत -शिवारात नर मादी बिबट्याचा मृत्यूची घटना आज समोर आल्याने खळबळ उडाली. हे नर-मादी बिबट्या विद्युत वितरण कंपनीच्या कॅपॅसिटरच्या पोलला स्पर्श झाल्याने दोन्ही बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पिंपळखुटा ते राहेर रस्त्यावरील शेत शिवारात असलेल्या तुळसाबाई मंदिराच्या पाठीमागच्या नितीन खरप यांच्या शेतात आज सकाळच्या सुमारास नर-मादी बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. सदर घटना गावकऱ्यांनी वनविभागाला कळवली. यावेळी पातुर वनपरिक्षेत्र अधिकारी डी डी मदने आलेगांव वनपरिक्षेत्र अधिकारी, एस डी नालीदे यांनी त्यांच्या कर्मचार्यांसह घटनास्थळी पोचून पाहणी केली असता बिबट्या नर-मादी मृत्यू अवस्थेत आढळले व नर-मादी बिबट्याचे सर्व अवयव साबुत होते या ठिकाणी विद्युत वितरण कंपनीचे होल्टेज स्थिर ठेवण्यासाठी बसविण्यात आलेल्या कॅपिसिटरच्या पोलला धक्का लागून नर-मादी बिबट्या व एका मुगसाचा मृत्यू झाला असावा असा अंदाज केला आहे संबंधीत घटनेचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यांना अकोला येथे शेवविच्छेद करण्या करिता नेण्यात आले आहे त्यानंतर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.