केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले ह्यांचा वाढदिवस मोफत शालेय साहित्य वाटप करून साजरा

अविनाश पोहरे / अकोला एक्सप्रेस न्यूज नेटवर्क, पातूर
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री भारत सरकार नामदार रामदासजी आठवले साहेब ह्याचा वाढदिवस पातूर तालुक्यातील ग्राम आगीखेड येथील स्वातंत्र्य सैनिक बाबूजी तायडे माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय आगीखेड येथे केला कोरोना काळात बंद असलेल्या शाळा परत सोशल डिस्टन्स चे पालन करून चालू झाल्या परंतु असंख्य पालक आर्थिक अडचणीत असल्यामुळे आपल्या पाल्याला शैक्षणिक शालेय उपयोगी साहित्य वेळेत देऊ शकत नसल्यामुळे त्यांना एक सामाजिक बांधिलकी म्हणून रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद जिल्हासंघटक आकाश हिवराळे ह्यांच्या वतीने केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब ह्यांच्या वाढदिवसानिमित्त वर्ग 9 वी ते 12 वी च्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले.ह्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक धर्मे सर होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून शाळेचे शिक्षक शालीग्राम सरदार सर,गांजरे सर,मानकर सर,परमाळे मॅडम,काळे सर,शिंदे सर,बोचरे सर,राजनकर सर,चव्हाण सर,स्वाधीन बहुद्देशीय संस्थेचे सचिव निलेश हिवराळे,ईगल ग्रुप चे अध्यक्ष सागर इंगळे प्रहार सेवक अमोल करवते,सुरेंद्र अवचार आदी प्रामुख्याने उपस्थित होते तर विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते अमर हिवराळे,रोहित हिवराळे,सुरेंद्र अवचार,रोहन हिवराळे,रुपेश अवचार,आनंद हिवराळे,हर्षल सिरसाट,वैभव अवचार,उज्ज्वल अवचार,आदित्य अवचार,स्वप्नील घुगे,स्वप्नील अवचार,आशिष अवचार अभिजीत किरतकार आदि सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद अकोला द्वारा करण्यात आले होते.