शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची 122 वी जयंती उत्साहात साजरी

विविध कार्यक्रम व स्पर्धा घेऊन भाऊसाहेबांना ऑनलाईन पद्धतीने केले अभिवादन…
अविनाश पोहरे –
अकोला एक्सप्रेस न्यूज नेटवर्क, पातूर
पातूर – शिक्षणमहर्षि आणि देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२२ व्या जयंती उत्सवानिमित्त डॉ.एच.एन. सिन्हा महाविद्यालय येथे डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याचे पूजन व हारार्पण डॉ. एच. एन. सिन्हा महाविद्यालय विकास समिती, सदस्य मा. श्री. अशोक रघुवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सुरुवात करण्यात आली. तसेच जयंतीउत्सवाचे उदघाटन अध्यक्ष डॉ. कृष्णराव भुस्कुटे होते. तर प्रमुख उपस्थिती मा. डॉ. व्हि.एन. जायले, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या समन्वयिका प्रा. डॉ. ममता इंगोले,सहसमन्वयक डॉ.संजय खांदेल,प्रमुख वक्ते म्हणून डॉ. ललित अधाने इत्यादी उपस्थित होते. यांनतर कोरोना योद्धाचे योगदान, रक्तदान शिबिर, कोविडवर आधारित प्रश्नमंजुषा, भाऊसाहेब यांचा जिवनपट, एतिहासिक आणि सांस्कृतिक पातूर, अश्या प्रकारे सदर सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. यांनतर मा. गुलाबराव पाटील ताले यांच्या हस्ते डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले.
सकाळी ९ वाजता भाऊसाहेबांना आदरांजली अर्पण करून अभिवादन केले.यावेळी श्री. शिवाजी शिक्षण संस्था अमरावती आजीवन सदस्य कृषीभूषण दादाराव देशमुख, प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले प्रा. डॉ. संतोष कायंदे, प्रा. डॉ. कैलाश अंभुरे, प्रमुख उपस्थिती म्हूणन डॉ. प्रकाश अंधारे उपशिक्षणाधिकारी
माध्यमिक जि.प. वाशीम, इत्यादी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम हा कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार काही बंधने असल्यामुळे यावर्षी जयंती उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करता आला नाही.शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची दखल घेऊन कार्यक्रमांची आखणी करण्यात आली.सकाळी आठ वाजतापासून डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थळी भाऊसाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण कार्यक्रम व स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या.
समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्हि.एन. जायले होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्यक्रमाच्या समन्वयीका डॉ. ममता इंगोले यांनी केले. विविध स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांचे कौतुक करून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार रोनील आहाळे यांनी मानले. यावेळी प्रा. डॉ. व्हि. जी. वसू, प्रा. संजय खांदेल, प्रा. दादाराव गायकवाड, प्रा. राहुल माहुरे, प्रा. हर्षद एकबोटे, प्रा.सारिका पाचराऊत, प्रा.दिपाली घोगरे, प्रा.समाधान चतरकर, प्रा. अतुल विखे, महादेव टापरे इत्यादी प्राध्यापक, कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.