संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कुलगुरूंना पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मुदतवाढ ची मागणी मान्य

–रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद जिल्हासंघटक आकाश हिवराळे ह्यांच्या विद्यार्थ्यांच्या विविध विषयांवर चर्चा..
अविनाश पोहरे – संपादक
अकोला एक्सप्रेस न्यूज नेटवर्क
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती येथे रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद द्वारा जिल्हासंघटक आकाश हिवराळे ह्यांच्या नेतृत्वात विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले त्यामध्ये कोरोना काळात असायंमेंट पद्धतीने परीक्षा झाल्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास झाले त्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मर्यादित जागा असल्यामुळे प्रवेशापासून वंचित राहावे लागत आहे.त्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 50 टक्के जागा वाढवून देण्यात याव्या.
पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक सत्र 2020-21 साठी प्रवेशासाठी मुदत वाढ देण्यात यावी ही मागणी तात्काळ मान्य करून दिली. असून 15 जानेवारी पर्यत मुदत वाढ देण्यात आली.असून विद्यार्थ्यांनी ह्याची नोंद घ्यावी.होणाऱ्या आगामी परीक्षा ह्या लेखी स्वरूपात घेण्यात याव्या व पर्यावरण ह्या विषयाची पुन्हा परीक्षा घेऊन अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका त्वरित प्रदान करण्यात याव्या अशा सविस्तर मागण्याचे निवेदन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती चे कुलगुरू मुरलीधर चांदेकर प्र कुलगुरू जयपूरकर सर,परीक्षा नियंत्रक हेमंत देशमुख सर आदींना दिले ह्यावेळी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद जिल्हासंघटक आकाश हिवराळे,अनिरुद्ध हिवराळे,मुकुल अरबट,शुभम डोंगरे,दिनेश तायडे,अश्विन निखाडे,पवन निखाडे,रुपेश नहाटे आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.