सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त क्रीडा स्पर्धा व महिला मेळावा संपन्न

अविनाश एस. पोहरे – संपादक
पातूर : दि.- 3/2/2021 स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या जयंतीनिमित्त महिला मेळावा व क्रीडा स्पर्धा पातूर शहरात संपन्न झाली.महिला आर्थिक विकास महामंडळ,अकोला अकोला द्वारा लोकसंचालित साधन केंद्र, पातूर च्या वतीने बचत गटातील महिलांच्या क्रीडा स्पर्धा व महिला मेळ्याव्याचे आयोजन करण्यात आले.स्थानिक सावित्रीबाई फुले विद्यालय पातूर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून धावण्याची शर्यत, कबड्डी, चमचा निंबु, खो-खो, अशा विविध स्पर्धेत बचत गटातील महिलांनी मोठ्या उत्साहात कार्यक्रमात सहभाग घेतला.सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पातूर नगर परिषदेच्या नगरसेविका सौ.वर्षाताई बगाडे, क्रीडा शिक्षक वानखडे सर उपस्थित होते,तर कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वीतेकरीता लोकसंचालित साधन केंद्र,पातूरच्या अध्यक्ष सौ.मीना उपर्वट, व्यवस्थापक चंद्रशेखर अंभोरे,उपजीविका समन्वयक उज्वला सुरवाडे,क्षमतावृद्धी समन्वयक ज्योती हातेकर,सहयोगीनी वंदना ठाकरे आदिंनी परिश्रम घेतले.