पातूर येथे द प्रोफेशनल करिअर अकॅडमीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्त अभिवादन.

गरजु मुलींना एक महिन्याचे मोफत स्पर्धा परिक्षा प्रशिक्षणाचे आयोजन.
पातूर :- शोषित, पिढीत तसेच महिलांच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती द प्रोफेशनल करिअर अकॅडमी पातूर च्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थाध्यक्ष पंकज पोहरे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिना निमित्त गरजु मुलींकरिता एक महिन्याचे मोफत स्पर्धा परिक्षा प्रशिक्षणाचे आयोजन केले असुन या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
पातूर शहरातील एकमेव सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेली द प्रोफेशनल करिअर अकॅडमी ही गेल्या तीन वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, कला, सांस्कृतिक क्षेत्रात पुढे असतांना दिसते. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषद सदस्य सुनिल फाटकर, संस्थाध्यक्ष पंकज पोहरे, दिनेश गवई, वसंत राठोड, प्रविण पोहरे,अनिल राठोड, प्रा. विलास भराडी, प्रा. शंकर गाडगे,प्रशांत निमकंडे आदि उपस्थित होते.