दिवंगत शेवंताबाई तेलगोटे यांच्या पुण्यतिथी निमित्त जिल्हा स्त्री रुग्णालयात गरजुंना ब्लँकेट व फळांचे वाटप

अविनाश पोहरे – संपादक
अकोला : सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणारे प्रज्वल उर्फ चिकुभाऊ तेलगोटे यांच्या आजी दिवंगत शेवंताबाई बबन तेलगोटे यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा स्त्री रुग्णालयात सध्या थंडीच्या दिवसांत आवश्यक असलेले गरजुंना ब्लँकेट, फळे व बिस्कीटांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणुन वंचित बहुजन आघाडीचे माजी महानगराध्यक्ष गौतम गवई, चंद्रराज रुग्ण सेवा समितीचे अध्यक्ष राजु भोर, दादु गवई होते. कार्यक्रमाचे आयोजन यशवंत तेलगोटे,सौ.रेखा तेलगोटे,सुमेध तेलगोटे, प्रज्वल तेलगोटे,वसंता तेलगोटे,सौ.कल्पना तेलगोटे यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पप्पु गवई,राजेश खाडे, प्रल्हाद गवई, सुनिल वाघमारे, प्रेम गोपणारायन,संघरत्न सोनोने, चंदन मोहोड, प्रितेश गवई, कान्हा भांगे, करण गवसर, बाबाराव इंगळे, अमित तायडे, दिशांत अवचार, अभिषेक इंगळे, करण सुरवाडे, संकेत इंगळे, प्रतिक सुर्वे, आशिष किरतकार, आदित्य पळसपगार, चिकु सुर्वे यांच्यासह मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा स्त्री रुग्णालयातील गरजुंनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.