मेडशी येथील श्रेत्र सहाय्यक तायडे सेवानिवृत्ती निमित्ताने वनविभागाच्या वतीने सत्कार

अजय चोथमल
प्रतीनीधी मेडशी
दि. ३१.-डिसेंबर मालेगाव वनपरिक्षेत्र वनविभाग कार्यालय मेडशी येथे श्रेत्र साहाय्यक एस. एस. तायडे यांची आज सेवानिवृत्त निमित्ताने वनविभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी तायडे यांच्या पत्नी, बहिन, जावाई उपस्थित होते.तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष एस. एस. नादुंरकर ( वनपरिक्षेत्र अधिकारी मेडशी) प्रमुख पाहुणे सिध्दार्थ वाघमारे, यु. आर. राऊत, गवई, विनायक नागरे, व सर्व वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.तायडे यांचे मुळ गाव अकोला आहे तर तिस वर्षे वनविभागा मध्ये कार्यरत होते या मध्ये जगंलात दिवसरात्र डिवटी करत परीवारा कडे लक्ष देत सागवान चोरट्या वर लक्ष ठेवन तायडे यांच्या कारकिर्दीत मोठमोठे चोरानां पकडु चोरीवर दबदबा कायम ठेवला त्या मुळे जवळपास सागवान चोरट्या मध्ये एक प्रकारची दहशत निर्माण झाली आहे.
आज श्रेत्र साहाय्यक तायडे यांना सेवानिवृत्त निमित्ताने सत्कार करण्यात आला.