जिल्हास्तरीय ऑनलाइन चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे – शिक्षणाधिकारी

अविनाश एस पोहरे – संपादक
पातूर : विदर्भ कला शिक्षक संघ, जिल्हा शाखा, अकोला द्वारा सातत्याने विद्यार्थ्यांकरिता नवनवीन कला उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.यावर्षी सुद्धा विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळण्यासाठी जिल्हास्तरीय ऑनलाइन चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. कोरोणा प्रादुर्भावापासून सुरक्षित राहून भीती मुक्त व आनंदी जीवन जगणे या उद्दिष्टाने स्पर्धा आयोजित केली आहे. सध्या स्थितीच्या अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी या निशुल्क स्पर्धेत सहभागी होण्याकरिता मा. मुख्याध्यापकांनी प्रोत्साहन द्यावे.
स्पर्धा निशुल्क राहील , प्रत्येक गटातून सर्वोत्कृष्ट असे ३० जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात येतील. प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. चित्र काढण्यासाठी ११बाय १५ इंच आकाराचा कागद वापरावा. रंग माध्यमांचे बंधन नाही. विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे फोटो आपल्या शाळेच्या कलाशिक्षक किंवा कला विषय संबंधित शिक्षकांना पाठवावी. कलाशिक्षक मिळालेल्या चित्र व त्यांची यादी मुख्याध्यापक यांच्या सही सह संघटनेकडे पाठवतील. विद्यार्थ्यांनी शाळेच्या माध्यमाने सहभाग घ्यावा.चित्राच्या समोरच्या बाजूला नाव, मोबाईल नंबर, वर्ग, गट क्रमांक इत्यादी आवश्यक तपशील सुस्पष्ट अक्षरात लिहिलेला असावा. अंतिम तारीख २० जानेवारी २०२१जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी केले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी आशिष चौथे ,प्रमोद गीते, राजेश्वर बुंदेले व स्पर्धा प्रमुख संदीप शेवलकार उपस्थित होते.