पातूर येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांचा सत्कार

अकोला एक्सप्रेस न्यूज नेटवर्क, पातूर
पातूर – महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने पातुर येथील पत्रकार बांधव आणि प्रशासकीय अधिकारी यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला आहे.6 जानेवारी रोजी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त पातुर येथील पत्रकार बांधवांच्या सत्कार समारंभाचे आयोजन पत्रकार दिनी महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक शंकरराव बोचरे होते
तर पातुर चे तहसीलदार दीपक बाजड, पातूर चे ठाणेदार तथा प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी हरीश गवळी ,ज्येष्ठ पत्रकार प्रदीप भाऊ देशमुख, पातुर तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष देवानंद गहिले, दैनिक लोकमत समाचार चे तालुका प्रतिनिधी अमरावती बोर्ड मेंबर सदस्य प्रा. सी पी शेकूवाले, दैनिक देशोन्नती चे पत्रकार संजय गोतरकर दैनिक भास्कर चे तालुका प्रतिनिधी अब्दुल कुद्दुस शेख आणि महात्मा फुले महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.गजानन रोडे यांची मंचावर उपस्थिती होती.या कार्यक्रमामध्ये संस्थेच्या वतीने शंकरराव बोचरे यांनी पातूरचे तहसीलदार दीपक बाजड आणि पातुर ठाणेदार हरीश गवळी यांचा सत्कार केला.तर कोरोणा काळात पातूरच्या पत्रकारांनी उल्लेखनीय कार्य केल्यामुळे पातुर येथील जेष्ठ पत्रकार प्रदीप भाऊ देशमुख, तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष देवानंद गहिले,दैनिक लोकमत समाचार चे तालुका प्रतिनिधी प्रा. सिपी शेकूवाले दैनिक देशोन्नती चे पत्रकार संजय गोतरकर गाव माझा चे पत्रकार किरण कुमार निमकंडे, अकोला एक्सप्रेस न्यूज चे संपादक अविनाश पोहरे ,दैनिक सकाळचे पत्रकार श्रीकृष्ण शेंगोकर, दैनिक भास्कर चे तालुका प्रतिनिधी अब्दुल कुद्दुस शेख अवर न्यूज अकोला चे सुनील गाडगे, प्रभुदास बोंबटकार, छायाचित्रकार सतीश कांबळे
सय्यद हसन बाबू आदींचा सत्कार स्मृतिचिन्ह आणि मास्क देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला आहे याप्रसंगी ठाणेदार हरीश गवळी आणि पातुर तहसीलदार दीपक बाजड यांनी मार्गदर्शन केले.तर ज्येष्ठ पत्रकार, प्रदीप देशमुख ,पत्रकार देवानंद गहिले, पत्रकार प्रा. सि पी शेकूवाले ,पत्रकार संजय गोतरकर यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रातील आपले अनुभव आणि पत्रकारितेबद्दल सविस्तर माहिती दिली आणि मार्गदर्शन केले तर समारोपीय विचार महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शंकरराव बोचरे यांनी व्यक्त करताना कोरोना काळामध्ये पातूरच्या पत्रकारांनी आणि प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे त्यामुळे पत्रकार दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या वतीने हा सत्कार करण्यात आला आहे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकार असल्याने सामाजिक दायित्व म्हणून सत्कार होणे अगत्याचे आहे असे म्हणून पातूरच्या पत्रकारांना पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्यात
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ.गजानन रोडे यांनी केले.तर सूत्रसंचालन भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा.गोविंद भालेराव आणि सहाय्यक प्रा. भौतिकशास्त्रज्ञ प्रा. प्रणोती खवणे आणि आभार प्रदर्शन प्रा.निरंजन नवले गणित विभाग प्रमुख यांनी केले.यावेळी डॉ. अस्मिता खांबरे ,प्रा. सुमित चौधरी ,प्रा. योगेश व्यवहारे ,प्रा.रोशनी लोमटे प्रा. योगेश भोसले तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी निशांत सदाफळे, पवन काळपांडे संजय बोराडे ,विरेंद्र सिंग सोळंके ,पंकज मडघे ,प्रशांत पाटील ,अमोल साळुंके ,मनोज राऊत आदीसह महात्मा फुले कला व विज्ञान महाविद्यालयाच्या कर्मचारी वृंद उपस्थित होते.