निराधार लाभार्थ्यांना गुरवारी पैसे मिळणार मागील दोन महिन्या पासुन लाभार्थी बँकेत मारत चकरा

अजय चोथमल
प्रतीनीधी मेडशी
मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील सेंट्रल बँक मध्ये मागील महिन्यात निराधार लाभार्थ्यांचे पैसे जमा झाले होते. तरी सुद्धा सेंट्रल बँके कडुन लाभार्थ्यांनां पैसै मिळत नसत. तर येथील युवा कार्यकर्ते अभिजीत मेडशीकर यांनी बँके मध्ये जाऊन बँक मँनेजरला या विषयी चर्चा केली. येत्या गुरवारी निराधार लाभार्थ्यांनां पैसे देण्याचे बँक मँनेजरनी सांगितले.
सेंट्रल बँक मध्ये निराधार, वयोवृद्ध, अपंग, वीधवा महिला लाभार्थ्यांची खाते आहेत तर या परीसरातील आठ ते बारा किलोमीटर वरून अपंग, विधवा, वयोवृद्ध लाभार्थ्यांनां चकरा माराव्या लागत आहे.त्या मुळे या लाभार्थ्यांनां मोठा त्रास सहन करावा लागला आहे.या लाभार्थ्यांनां जिवन जगण्यासाठी मोठा आधार आहे पण या लाभार्थ्यांनां दर महिन्याला पैसे दिले तर औषध, दवाखाना तरी करता येते त्या मुळे हे अपंग, वयोवृद्ध, विधवा महिला दर महिन्याला पगाराची वाट पाहत असतात.