सीमेवर शहीद होणाऱ्या जवानांना आमदार खासदार यांच्या पगारातून मदत द्या – रवींद्र घुगे (प्रहार संघटक)

अजय चोथमल
प्रतीनीधी मेडशी
प्रहार जनशक्ती पक्षाचे संघटक यांनी दिला मुख्यमंत्री व केंद्रीय संरक्षण मंत्री यांना आमरण उपोषणाचा ईशारा ) आपल्या भारत देशाच्या सीमेवर महाराष्ट्रातील जवान शहीद होतात परंतु त्यांच्या परिवाराला महाराष्ट्र शासनातर्फे कुठलीही आर्थिक मदत मिळत नाही, त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्ष वाशिम तर्फे सरकार ला इशारा देण्यात आला की आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे ही आमदार खासदार निवडून आलेले आहेत त्यांच्या पगारातून महाराष्ट्रातील देशाच्या सीमेवर यापुढे शहीद होणाऱ्या जवानांच्या परिवाराला आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी पंधरा हजार रुपये मात्र असे एकत्रित झालेली रक्कम शहिदांच्या परिवाराला आर्थिक मदत म्हणून देण्यात यावे असे आदेश सरकारने काढावे, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष वाशिम तर्फे आमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा प्रहार संघटनेचे प्रहारसेवक रविंद्रभाऊ घुगे, प्रविण घुगे व इतर प्रहारसेवक यांच्याकडून जिल्हाधिकारी वाशिम यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व भारताचे संरक्षण मंत्री यांना देण्यात आला.