ताज्या घडामोडी
महात्मा फुले वाचनालय बाळापूर येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी
बाळापुर दि 03/01/ 2021 रोजी बाळापूर शहरातील महात्मा फुले वाचनालय येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ गिताबाई जावरकार, तर प्रमुख उपस्थितीत संध्याबाई धनोकार,दत्तात्रय धनोकार,किरण हूसे, विवेक शेगोकार, प्रमोद धनोकार, सुनील घाटोळ, उदय धनोकार, साहेबराव धनोकार, प्रकाश कलोरे, यांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकून उपस्थित मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रशांत लहाने तर आभार प्रदर्शन अभिमन्यू धनोकार यांनी केले.कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी श्रीरंग धानोकार यांचे योगदान लाभले.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.