ताज्या घडामोडी

अकोला येथे पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा एल्गार

दुचाकीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून वाहिली श्रद्धांजली

अकोला एक्सप्रेस न्यूज नेटवर्क

अकोला- पेट्रोल व डिझेलचे दर प्रचंड प्रमाणात वाढल्याने सामान्य जनता त्रस्त झाली आहे. या त्रस्त जनभावनेची दखल घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. शिवाभाऊ मोहोड, माजी नगरसेवक मा. पंकजभाऊ गावंडे, महानगर अध्यक्ष करण दोड यांच्या नेतृत्वात सोमवारी अकोल्यात जोरदार निदर्शने, आंदोलन करण्यात आले. सामान्य जनतेकडून या आंदोलनाचे जोरदार समर्थन करण्यात आले.
पेट्रोल व डिझेलचे दर 90 रुपयांवर पोहोचले असून वाहनधारक या दरवाढीमुळे त्रस्त झाले आहेत. शिवाय पेट्रोल व डिझेलवर अनेक प्रकारचे व्यवसाय अवलंबून आहेत. पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांनाही मोठा फटका बसत आहे. वाहनधारकांसोबतच पेट्रोल-डिझेल वर अवलंबून असलेल्या इतर उत्पादन व सेवांची प्रचंड प्रमाणात दरवाढ होऊन महागाईचा सर्वत्र भडका उडालेला असताना व सामान्य जनता प्रचंड त्रस्त झालेली असताना केंद्र सरकार मात्र मुठभर उद्योगपतींच्या हिताची भूमिका राबविण्यात मग्न आहे. त्यामुळेच सामान्य जनतेचा आक्रोश केंद्रसरकार पर्यंत पोहोचविण्यासाठी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. संग्रामभैय्या गावंडे, माजी आमदार मा. बळीरामजी सिरस्कार, माजी जिल्हाध्यक्ष मा. श्रीकांतदादा पिसे पाटील, माजी महानगराध्यक्ष मा. राजकुमारजी मुलचंदानी, माजी नगरसेवक मा. पंकजभाऊ गावंडे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. शिवाभाऊ मोहोड व महानगराध्यक्ष मा. करणभाऊ दोड यांनी जोरदार आंदोलन केले.स्थानिक बसस्थानक चौकात दुचाकीची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून दुचाकीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ही दरवाढ अशीच कायम राहिली तर पुन्हा बैलगाडी वापरण्याची वेळ किंवा घोडेस्वारी करण्याची वेळ येऊ शकते या बाबीचे प्रतीक म्हणून आंदोलनात बैलगाडीवर दुचाकी बांधण्यात आली व घोडस्वार आंदोलनात सहभागी झाले. केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाविरोधात जोरदार नारेबाजी करून यावेळी रास्ता रोको करण्यात आला. रास्ता रोकोमुळे वाहनधारकांना थोडा त्रास झाला तरीही त्यांच्याकडून व सामान्य नागरिकांकडून या आंदोलनाचे व मागणीचे समर्थन करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी पेट्रोल दरवाढीच्या विरोधात आपल्या प्रतिक्रिया व भावना व्यक्त केल्या. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुनील शिरसाट, सामाजिक न्याय विभागाचे महानगर अध्यक्ष मिलिंद गवई, माजी नगरसेवक फजलू पहेलवान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष किरण ठाकरे, राम म्हैसणे, चैतन्य लाखे यांचेसह हर्षल ठाकरे, ताज राणा, श्रीकांत साबळे, पवन सावरकर,कृष्णा बोंबटकार शीलवंत खंडारे, शिव ठाकरे, प्रणव तायडे पाटील, कुंदन धुरंदर, बाळासाहेब तायडे, अभिषेक खंडारे, हर्षद खडसे, वैभव मानकर, प्रशांत थोरात, अजिंक्य टेपरे, संतोष इंगळे, अफीफ कुरेशी, मोहम्मद अदनान, इजहार अहमद, साहिल अहमद, राहुल भगेवार, ज्ञानेश्वर मते, अनुप कुंभरे, प्रसाद देशमुख, आदित्य पवार, रोहित दामोदर, प्रद्युम्न लोणकर, आनंद भाकरे, गौरव चव्हाण, प्रज्वल सोळंके, पंकज काळे, शुभम राऊत, अदनान खान, प्रणव तायडे, साबीर फजलू शेख, यश साठरोठे, सूरज गुंजकर, ऋषभ काळे, शाम शिंदे, योगीराज इंगळे, मुकेश तराले, कार्तिक तोंडे, संतोष बूंदे, ओमकार मदनकार, अनंत पाचबोले, गौरव मते यांचेसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. अशी माहिती जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मोहन शेळके यांनी दिली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: