जेष्ठ पत्रकार गजानन देशमुख यांना पत्नीशोक पत्नीचे नेञदान, किडनी, अवयवदान देऊन देशमुख परिवाराचा समाजापुढे आदर्श

डॉ.संदीप सुशीर
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
दर्यापूर- तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार तथा संत गाडगेबाबा मिशनचे गजानन देशमुख यांच्या अर्धांगिनी सौ. रोहिणी गजानन देशमुख यांचे 7 जानेवारीला निधन झाले.निधनापुर्वी मुलगा रितेश देशमुख, मुलगी सौ रितिका देशमुख च्या सहमतीने गजानन देशमुख यांनी पत्नीचे नेञदान,अवयवदान, व किडणी भंसाली हॉस्पिटल परतवाडा येथे देऊन समाजापुढे आदर्श निर्माण केला.आमदार बळवंत वानखडे व सरपंच संघटना राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे यांनी परतवाडा येथे भेट देऊन डॉ.भंसाली यांचे व देशमुख परिवाराचे अवयव दाना बद्दल शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. अनेक अनाथ मुलांचा सांभाळ करणारी गृहमाता रोहिणीताईंनी संत गाडगेबाबांच्या विचारकार्यावर आपले पती गजानन देशमुख यांच्या खांदाला खांदा लावून अविरत समाजकार्य केले.त्या आपल्या पश्चात पती, एक मुलगी,एक मुलगा सोडून गेल्या. त्या मृत्यू समयी 52 वर्षाच्या होत्या. अनेक अनाथांच्या माता अचानक सोडून गेल्याने देशमुख परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.ईश्वर त्यांना दुःखातून सावरण्याची शक्ती देवो. व त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.साप्ताहिक मीडिया धनशक्ती न्यूज व अकोला एक्सप्रेस न्युज यांच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.त्यांच्यावर उद्या 8 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता मोक्षधाम दर्यापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.