तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथे स्व. सरलाबाई गहिलोत जयंतीउत्सव साजरा

“बदलत्या काळानुसार स्वतःहात बदल घडवून आणावा” – स्नेहप्रभादेवी गहिलोत
अविनाश पोहरे – संपादक
पातुर:- (10 जानेवारी) स्थानिक तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथे स्व. सरलाबाई गहिलोत जयंती उत्सव अतिशय साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला.स्व. सरलाबाई गहिलोत यांचा 97 वा जयंती महोत्सव कोविड-19 मुळे अतिशय साध्या पद्धतीने करण्यात आला. कार्यक्रमा अंतर्गत कोविड-19 मुळे शिक्षण क्षेत्रामध्ये कशा प्रकारची बदल झालेली आहेत आणि झालेल्या बदलांमध्ये शिक्षकांनी स्वतःमध्ये कशा प्रकारे बदल घडवून आणावेत याबद्दल मार्गदर्शन स्नेहा प्रभादेवी गहलोत सचिव बेरार एज्युकेशन सोसायटी पातुर. यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये नमूद केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बी एम वानखडे सर यांनी केले, तर सरलाबाई गहलोत यांच्या जीवन प्रवासाबद्दल विजयसिंह गहलोत, व्यवस्थापक बेरार एज्युकेशन सोसायटी पातुर यांनी प्रकाश टाकला. सरलाबाई गहिलोत ह्या किती शिस्तप्रिय होत्या याची उदाहरणे देऊन त्यांचा जीवनपट मांडण्याचा प्रयत्न प्राध्यापिका के. व्ही. तायडे यांनी केला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्नेहप्रभादेवी गहलोत- सचीव, प्रमुख अतिथी विजयसिंह गहिलोत, व्यवस्थापक बेरार एज्युकेशन सोसायटी पातुर ,प्राचार्य बी. एम. वानखडे सर ,एस श्रीनाथ सर प्राचार्य बाभुळगाव शाखा, उपप्राचार्य एस बी ठाकरे सर , एम पी उंबरकर प्राचार्या, मदर इंडिया कॉन्व्हेंट पातुर उपस्थित होते. कार्यक्रमा च्या यशस्वितेकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे संचालन प्रा. पी पी वाकोडे व आभार प्रदर्शन सुभाष इंगळे एनसीसी ऑफिसर यांनी केले.