ताज्या घडामोडी
पातूर येथे पत्रकार संघटनेच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

अकोला एक्सप्रेस न्यूज नेटवर्क, पातूर
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने पातूर येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष देवानंद गहिले, पातुर येथील ज्येष्ठ पत्रकार प्रदीप देशमुख, पत्रकार संघटनेचे सचिव प्रा. सि. पी. शेकूवाले, संजय गोतरकर, अविनाश पोहरे , सतीश कांबळे सय्यद हसन बाबू यांच्यासह इतर पत्रकार बांधवांची उपस्थिती होती. यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे मनोगत व्यक्त करण्यात आली आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.